VIDEO: फ्रान्स अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या थोबाडीत मारली, आरोपीला पकडताना सुरक्षा रक्षकांची धांदल

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या थोबाडीत मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

VIDEO: फ्रान्स अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या थोबाडीत मारली, आरोपीला पकडताना सुरक्षा रक्षकांची धांदल
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 8:42 PM

पॅरिस : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या थोबाडीत मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मॅक्रॉन एका ठिकाणी उभ्या असलेल्या गर्दीला अभिवादन करत हँडशेक करत होते. त्याचवेळी हा प्रकार घडला. या प्रकारानंतर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेची मात्र चांगलीच धांदल उडाली (France President Emmanuel Macron got slapped by a person).

मॅक्रॉन यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना सुरक्षा दलाने अटक केलीय. सुरक्ष यंत्रणा यामागील कारणांचा तपास करत आहे. तपासानंतरच या आरोपींच्या हल्ल्यामागील सत्य समोर येणार आहे.

नेमका काय प्रकार घडला? व्हिडीओ पाहा :

मॅक्रॉन आपल्या सुरक्षा रक्षकांसह जात असताना समोर उभ्या असलेल्या गर्दीला अभिवादन करतात. त्यानंतर एक व्यक्ती त्यांना हँडशेकसाठी हात पुढे करतो. त्याचा आदर करत मॅक्रॉन त्याला हँडशेक करतात. तेवढ्यात हा व्यक्ती मॅक्रॉन यांच्या थोबाडीत मारतो. यामुळे एकच गोंधळ उडतो.

या हल्ल्यानंतर मॅक्रॉन तातडीने गर्दीपासून बाजूला होतात. तसेच सुरक्षा रक्षकही अलर्ट होऊन हल्लेखोरांच्या मुसक्या आवळतात. यानंतर सरक्षा रक्षकांकडून या हल्लेखोरांना पोलीसी खाक्या दाखवला जात असतानाच मॅक्रॉन पुन्हा गर्दीच्या दिशेने येत सुरक्षा दलाला काही सूचना करताना दिसतात.

हेही वाचा :

फ्रान्सच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण, लवकर रिकव्हर व्हा म्हणत मोदींचे फ्रेन्चमध्ये ट्विट

तिघांच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये ‘मॅक्सिमम अलर्ट’, भारत सोबत असल्याचं सांगत मोदींकडून धीर

जगभरात ‘नमस्ते’ला प्राधान्य, फ्रान्सचे अध्यक्ष आणि जर्मनीच्या चान्सलर यांचाही एकमेकांना नमस्कार!

व्हिडीओ पाहा :

France President Emmanuel Macron got slapped by a person