
जगात अनेक देश आहेत. त्यातील काही देशांचे रितीरिवाज आणि नियम अत्यंत वेगळे आहे. येथील संस्कृती,राहण्याची पद्धत आणि इतर गोष्टी इतक्या भिन्न आहेत की तुम्हाला त्या ऐकून नक्कीच आश्चर्यचकीत झाल्यावाचून राहणार नाही.हे देश जगण्याची जी रीत दाखवतात ती पाहून पर्यटक म्हणून तुम्हाला स्तिमित व्हायला होते. चला तर अशा देशाची माहिती घेऊयात…
भूतान हा जगातला सर्वात आनंदी देश म्हटला जातो. येथे जीडीपी ऐवजी लोकांना आनंदाला जास्त महत्व आहे. हा हिमालयीन देश ७० टक्के जंगलाने व्यापलेला आहे. ज्याला लोक जगातला शेवटचा शांगरी-ला म्हणतात. भूतानच्या काही परंपरा अनोख्या आहेत. येथे मिरची केवळ मसाला नाही तर प्रत्येक पंक्वानाचा हिस्सा आहे. भात येथे लाल रंगात वाढला जातो. येथे प्रत्येक पर्यटकाला प्रति दिन २५० डॉलर शुल्क द्यावे लागते. यात निवास, भोजन आणि गाईडची सुविधा मिळते. या नियमामुळे देशाची सौदर्य आणि शांतता कायम रहाते. आणि गर्दीही कमी रहाते.
कझाकिस्तान मध्य आशियातील असा देश आहे ज्यांची परंपरा आणि संस्कृती भिन्न आहे. येथील राष्ट्रीय पेय किण्वित घोड्यांच्या दूधापासून तयार करतात. सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ काजी नावाचा स्मोक्ड हॉर्समीट सॉसेज आहे. येथील पारंपारिक खेळ ‘बुजकशी’ आहे. ज्याचा अर्थ मृत बकरीला पकडणे असा आहे. या खेळात घोड्यांवर स्वार होऊन खेळाडू या मृत बकरीच्या डोके नसलेल्या शरीराला पकडण्यासाठी प्रतिस्पर्धा करतात. कझाकिस्तान क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातला नववा सर्वात मोठा देश आहे. येथे १३० देशाचे नागरिक रहातात. देशाची विशालता आणि विविधता या देशास अद्भभूत आणि अनोखे बनवते.
उत्तर कोरिया जगातील सर्वात अजब देश आहे. हा देश एक वेगळा, नियंत्रित आणि अर्ध साम्यवादी देश आहे. येथे पर्यटक केवळ चीनच्या बीजिंग येथूनच प्रवेश करु शकतात. येथे तुमच्यासोबत दोन सरकारी गाईड कायम असतात. तुमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाते. सरकारला दाखवायचे आहे तेच दाखवले जाते. येथे हुकूमशाहीची झलक पाहायला मिळते. येथे जाण्यासाठी व्हीसा देखील बींजींगमधून जारी केला जातो. त्यामुळे प्रवासाआधी सर्व सरकारी सूचना नीट वाचाव्या लागतात.
सोव्हीयत रशियाच्या संघातून बाहेर बाहेर पडून जेव्हा बहुतांशी देश युरोपीय संघात सामील होऊ लागले तेव्हा बेलारुसने एकटे राहण्याचा निर्णय घेतला. रशिया आणि पोलंडच्या दरम्यान वसलेल्या या देशाची राणी मिन्स्क अनेकदा उद्धवस्त होऊन पुन्हा वसली आहे. या शहरातील पारंपारिक इमारतींच्या मध्ये सोव्हीएत काळातील अनेक मोठी स्मारके येथे पाहायला मिळतात. ग्रोड्नो मेडिकल स्टेट यूनिव्हर्सिटीच्या तहखान्यात मानवी शरीराच्या विकृतींचा घाबरवणारा संग्रह आहे. बेलारुसच्या त्या प्रवाशांसाठी खास आहे ज्यांना शहरातील गर्दीपासून शांत ठिकाणे फिरायची आहेत.
अर्मेनिया हा एक असा देश आहे जेथे बुद्धीबळ हा केवळ खेळ नव्हे तर शाळेतील अनिवार्य विषय आहे. मुले येथे गणित आणि इतिहासासारखा बुद्धीबळाचा खेळ शिकतात. येथे बुद्धीबळाला राष्ट्रीय खेळ मानाला जातो. इतिहास आणि संस्कृतीने पुरेपर असलेला हा देश त्याची राजधानी येरेवनसाठी देखील ओळखला जातो. अर्मेनिया देशाची ख्रिस्ती इतिहास खूप जुना आहे. अनेक लोक अजूनही मानतात की नोहाची नाव माऊंट अरारतच्या बर्फाखाली गाडली गेलेली आहे. जो या देशाची आस्था आणि ओळखीचा मोठा भाग आहे.