AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेडवर लोळत पडण्याची अनोखी स्पर्धा, इतके तास लोळत पडणारा ठरला विजेता

समजा तुम्हाला नुसते बेडवर लोळत पडायला सांगितले आणि वर जास्त लोळत पडल्यामुळे पुरस्कार देऊन गौरव केला. अशाच एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक लोकांनी भाग घेतला होता.

बेडवर लोळत पडण्याची अनोखी स्पर्धा, इतके तास लोळत पडणारा ठरला विजेता
A unique competition to stay in bed
| Updated on: Nov 23, 2025 | 4:58 PM
Share

चीनमध्ये बेड बनवणाऱ्या एका कंपनीने तिच्या कँपेनिंगसाठी एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला लाईव्ह स्ट्रीम केले गेले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रतिस्पर्धींना केवळ या बेडवरुन पडून रहायचे होते. जास्त वेळ बेडवर झोपणाऱ्याला विजेता मानले जाणार होते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार या स्पर्धेतला सोशल मीडिया आणि अन्य प्लॅटफॉर्मवर कंपनीने तिच्या प्रसिद्धीसाठी लाईव्ह स्ट्रीम केले. या स्पर्धेने लाखो प्रेक्षकांना आकर्षित केले.

या व्यक्तीने जिंकली स्पर्धा

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या २३ वर्षाच्या एका तरुणाला विजयी घोषीत केले गेले. या तरुणाने लागोपाठ ३३ तास आणि ३५ मिनिटांपर्यंत गादीवर झोपून राहाण्याचा विक्रम केला. शियाओक्सियांग मॉर्निंग हेराल्डच्या बातमीनुसार एका स्थानिक गादी निर्माण करणाऱ्या ब्रँडने ही स्पर्धा १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१८ वाजता उत्तर चीनच्या मंगोलिया येथील बाओटौ स्थित एका शॉपिंग सेंटरमध्ये सुरु केली.

या स्पर्धेचे शीर्षक लोकप्रिय शब्द पडून राहापासून घेतले होतो. चीनी भाषेत याला तांग पिंग म्हटले जाते. हे त्या मानसिकतेला दर्शवते जी कठीण मेहनतीला अस्वीकारतात. तसेच न्यूनतम कामाला प्राथमिकता देते. जी प्रचंड सामाजिक दबाव आणि कठीण नोकरी बाजारामुळे तरुणांमध्ये लोकप्रिय झाली आहे.

काय होते नियम

स्पर्धेत सहभागी व्यक्तीने गादी सोडू नये, शौचालयाला जाऊ नये, तसेच गादीवर बराच काळ पडून राहिल, तोच विजेता बनेल. सहभागी उमेदवाराला केवळ कुशी बदलण्याची, पुस्तक वाचण्याची आणि मोबाईल फोनशी खेळण्यास परवानगी नाही. त्यांना टेकअवे उत्पादन ऑर्डर करणे तसेच पोटाच्या आधारे उपडी झोपून आवडते पदार्थ खाण्याची देखील परवानगी होती.

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या बहुतांशी लोकांनी शौचालयाच्या समस्येपासून वाचण्यासाठी डायपर घातले होते. बातमीनुसार सुमारे २४० लोकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ज्यापैकी १८६ लोकांनी ही स्पर्धा धुम्रपानासाठी ही स्पर्धा अर्ध्यातून सोडली.

इतके तास बेडवर पडून राहिले

३३ तास आणि ९ मिनिटे झाल्यानंतर केवळ तीनच लोक टीकून राहिले. आयोजकांनी काठीण्य पातळी वाढवत उरलेल्या तीन लोकांना एक साथ आपले हात आणि पाय उठवण्यास सांगितले. ज्या व्यक्तीने बराच काळ असे केल त्याला अखेर विजयी घोषीत केले.

अखेरीस २३ वर्षांचा एक युवक ही स्पर्धा सर्व अडचणींवर मात करीत जिंकला. तो म्हणाला की त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला या स्पर्धेची लिंक पाठवली होती आणि भाग घेण्यास सांगितले होते.

जिंकणाऱ्याला मिळाले इतके पैसे

आपण जास्त तयारी केली नव्हती. स्पर्धेच्या दरम्यान मी विचार केला होता की आता हार मानूया. परंतू माझ्या गर्लफ्रेंडने मला प्रोत्साहन देत पुढे जात रहा असे सांगितले. पहिल्या तीन विजेत्यांना पुरस्कार देण्याला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्यास १००० युआन ( १४० डॉलर ), दुसऱ्या विजेत्याला २००० युआन ( २८० डॉलर) आणि पहिले स्थान मिळवणाऱ्याला ३,००० युआन ( ४२० अमेरिकन डॉलर ) म्हणजे ३७ हजार रुपये मिळाले.

पहिल्या स्थानावर आलेल्या विजेत्याने सांगितले की मी या पैशाने माझ्या मित्राने हॉटपॉट डिनर देणार आहे. या स्पर्धेदरम्यान ते मला भेटायला आले होते आणि माझ्यासाठी त्यांनी खाण्यापिण्याच्या वस्तू आणल्या होत्या.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.