चक्क दुधापासून तयार होतात कपडे, कसे तयार केले जातात?, एका शर्टाची किंमत किती ?
तुम्ही अनेक प्रकारचे कपडे पाहिले असतील रासायनिक पॉलीस्टर ते वनस्पती धाग्यांपासून तयार होणारे लिननचे कपडे पाहिले असतील परंतू आता चक्क दूधापासून तयार होणार कपडे बाजारात आले आहेत.

Milk clothes: ज्या दूधाला फाटल्यानंतर तुम्ही खराब म्हणून फेकून देत असता त्यापासून डिझायनर साडी, कुर्ते आणि फॅशनेबल आऊटफिट तयार केले जात असतात. ऐकायला हे विचित्र वाटले परंतू दूधापासून कपडे तयार करण्याची इंडस्ट्री सध्या चर्चेत आहे. या कपड्यांना मिल्क फॅब्रिक म्हणतात. असा कपडा जो दिसायला रेशमासारखा मुलायम आणि परिधान करण्यासाठी खूपच आरामदायी असतो. दूधापासून तयार होणारे कपडे हे आता थंडीपासूनही बचाव करत आहेत.
किती दूध लागते आणि किंमत काय ?
1 लिटर दूधापासून सिर्फ 10 ग्रॅम मिल्क फायबर बनते. म्हणजे साधारण एका टी-शर्टला तयार करण्यासाठी 60-70 लिटर दूधाची गरज लागते. त्यामुळेच हे फॅब्रिक खूपच महाग आहे. आणि केवळ प्रिमियम ब्रँड्स याचा वापर करु शकत आहेत. यामुळे मार्केटमध्ये मिल्क फॅब्रिकची किंमत गगनाला भिडलेली आहे. 1 मीटर फॅब्रिकची किंमत सुमारे 15,000 ते 45,000 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे एक साडी घ्यायची झाली तर 3 ते 5 लाख रुपयांचा खर्च येतो. या मिल्क फॅब्रिकची किंमत इतकी का जास्त आहे ? ते कुठे बनवले जाते ?
कोण बनवते दूधवाले कपडे ?
जग वेगाने सस्टेनेबल फॅशनकडे वळत आहे. लोक आता प्लास्टीक पासून तयार झालेले पॉलिस्टर सोडून असे फॅब्रिक निवडत आहेत. जे निसर्गाचे नुकसान न होता तयार होत आहे. याच विचारातून मिल्क फॅब्रिकचा जन्म झाला. याचे पूर्ण श्रेय जर्मनीच्या एका इनोव्हेटीव्ह कंपनी Qmilk ला जाते.
Qmilk हा साधा ब्रँड नाही. ही कंपनी ताजे दूध न वापरता इंडस्ट्रीयल वेस्ट मिल्कचा वापर करते. जे दूध खराब होते त्याला लाखोच्या टनात फेकून दिले जाते. एकट्या युरोपात सुमारे 20 लाख टन दूध दरवर्षी खराब होते. आणि या खराब दूधाला Qmilk कंपनी अमु्ल्य फॅब्रिकमध्ये रुपांतरीत करते.
दूधापासून कापड कसे तयार होते ? (स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)
1. सर्वात आधी दूध नासवले जाते. म्हणजे दूधाला असे प्रोसेस केले जाते की त्यात ठोस भाग ( कर्ड ) वेगळा होईल.
2. कर्डपासून केसिन प्रोटीन काढले जाते. हेच प्रोटीन पुढे जाऊन फॅब्रिकचा बेस बनते.
3. केसिनला पाण्यात विरघळून लिक्वीड तयार केले जाते. त्यामुळे ते मशीनमध्ये सहज प्रोसेस होऊ शकेल.
4. या लिक्विडला स्पिनिंग मशीन तंतूत त्याचे रुपांतर करते. मशीन रेशमासारखे त्याचे पातळ तंतू तयार करते.
5. तयार तंतूना धाग्यासारखे स्पिन केले जाते. यातून फायबर खूपच मुलायम आणि चमकदार होतात.
6. यानंतर धाग्यांना विणून कापड तयार केले जाते. ही संपूर्ण प्रोसेस रसायनाशिवाय होते. त्यामुळे हे फॅब्रिक 100% बायोडिग्रेडेबल, स्कीन फ्रेंडली आणि इको – फ्रेंडली असते.
दूधापासून कपडे बनवण्याचा इतिहास खूप जुना
इटलीत साल 1930 मध्ये दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी लोकरीची तुटवडा झाला होता. तेव्हा इटलीच्या संशोधकानी दूधाच्या प्रोटीनपासून धागा तयार केला. ज्याचे नाव लानिटाल (Lanital) ठेवले. लाना म्हणजे लोकर आणि इटलीतून तयार केले म्हणून लानिटाल. मुसोलिनी यांच्या सरकारमध्ये हे फॅब्रिक खूप लोकप्रिय झाले. परंतू युद्ध संपल्यानंतर स्वस्त लोकर आणि सिथेंटिक फॅब्रिक मार्केटमध्ये आल्याने लानिटाल हळूहळू कमी झाले. आता नव्वद वर्षांनंतर पुन्हा 2025 मध्ये या टेक्नॉलॉजी ग्रँडचे पुनरागमन झाले आहे. यावेळी फॅशनच्या जगात हे मोठा बदल घडवेल असे म्हटले जात आहे.
दूधापासून तयार कपड्यांची खासीयत?
रेशमापेक्षा 3 पट जास्त मुलायम असते.
एंटी-बॅक्टीरियल असल्याने घामाची दुर्गंधी येत नाही.
थर्मल-रेग्युलेटेड म्हणजे थंडीत उष्ण आणि गरमीत थंड रहाते.
एलर्जी-फ्री असल्याने संवेदनशील त्वचेच्या लोकांना नवा पर्याय
