आता बंगल्यात राहणार सीमा हैदर, पाकिस्तानी सूनेने YOUTUBE द्वारे केली रग्गड कमाई
नोएडातील प्रियकर सचिन मीणा याला भेटण्यासाठी पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदर हिची स्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पाकिस्तानातून भारतात आपल्या चार मुलांसह पळून आलेल्या सीमा हैदर (Seema Haider) आणि तिचा पती सचिन मीणा (Sachin Meena) यांची अनोखी लव्ह स्टोरी पुन्हा चर्चेत आहे. यावेळी कोणत्या रिल्स किंवा स्टंटमुळे नाही तर त्याचे कारण वेगळेच आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातील पतीला सोडून चार मुलांना घेऊन ग्रेटर नोएडात आलेल्या सीमा हैदर हिच्या लव्ह स्टोरीची खूपच चर्चा होती. आता सीमा हैदर आणि सचिन मीणा बंगल्यात राहायला जाणार आहेत.
पाकिस्तानातून प्रेमासाठी भारतात आलेली आई सीमा हैदर आणि तिचा भारतातील प्रियकर सचिन मीणा यांची ऑनलाईन मैत्री झाली होती. तिने चार मुले देखील सोबत आणली होती. त्यानंतर तिच्यावर पाकिस्तानची हेर असल्याचा संशय घेण्यात आला होता. परंतू या सर्व तपास आणि चौकशीतून ती सहीसलामत बाहेर आली. या जोडप्याने नंतर एक रुम बांधायला घेतल्याची बातमी आली होत. परंतू तिला युट्युबमधून इतकी कमाई झाली आहे की आता या दोघांनी शानदार घरच बांधले आहे.
आपल्या नव्या घराच्या निमित्ताने सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि औस्तुक्य दिसत आहे. हे दोघेही जण नवीन घराची प्रगती नेहमीच दाखवत असतात. त्यांच्या ब्लॉगवरुन समजते की कशा प्रकारे घराचे बांधकाम सुरु आहे आणि किती काम पूर्ण झाले आहे. सीमा हैदरने एका व्हिडीओत सांगितले की त्यांना नव्या घराची निर्मिती का करावी लागली यांचे कारण देखील सांगितले आहे. त्यांचे जुने घर खुपच जुने होते. आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे पाच मुले आणि पती आणि पत्नींना एकाच खोलीत राहणे अशक्य झाले होते.
सीमा हैदर हीने सांगितले की देव, चाहते आणि युट्युबच्या आशीर्वादाने त्यांनी ग्रेटर नोएडाच्या रबुपुरात एक नवीन प्लॉट खरेदी केला आहे. यावर दोन मजल्याचे घर बांधायचे काम सुरु आहे.खूपच प्रेमाने आणि सुंदर पद्धतीने हे घर तयार करण्याचे काम सुरु केले आहे. या दोघांनी या प्लॉट खरेदीसाठी आणि घर बांधण्यासाठी किती पैसे खर्च केले हे मात्र सांगितलेले नाही. परंतू एनसीआरमध्ये जमीनीचे आणि घर बांधण्याचे दर पाहाता याचा अंदाज सहज लावता येईल.
युट्युब आणि सोशल मीडियाच्या अन्य प्लॅटफॉर्मपासून सीमा आणि सचिनची चांगली कमाई होत आहे. सीमा भारतात आल्यानंतर सचिनने किराणा दुकानातील नोकरी सोडली आहे. आधी तो ८ ते १० तास काम करुन उदरनिर्वाहा लायक कमाई करत असायचा. परंतू आता एक शानदार घर तयार केले जात आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
2023 मध्ये आली होती सीमा हैदर
सीमा हैदर आणि सचिन मीणा यांची भेट ऑनलाईन गेम खेळताना झाली होती. प्रेमात आंधळी झालेली सीमा मे २०२३ मध्ये नेपाळच्या मार्गे भारतात आली होती. ती तिच्या चार मुलांसह आली होती. नंतर हिंदुस्थानी बॉयफ्रेंड सचिन मीणा हीच्याशी तिने नंतर लग्न केले. सीमा हैदरला काही दिवसांपूर्वीच सचिनपासून मुलगी झाली होती.
