AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबई ते कतार… मध्य-पूर्वेत खतरनाक डाव, ट्रम्प यांची उडाली झोप, इराणची टार्गेट लिस्ट समोर

Iran US Tensions: इराणच्या खतरनाक योजनेने सध्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे. होर्मुझ समुद्रधुनीतील वाद ट्रम्प यांना चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. काय आहे इराणचा सिक्रेट प्लॅन? काय आहे ती टार्गेट लिस्ट?

दुबई ते कतार... मध्य-पूर्वेत खतरनाक डाव, ट्रम्प यांची उडाली झोप, इराणची टार्गेट लिस्ट समोर
इराण, अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Jul 17, 2026 | 10:02 AM
Share

Iran US Tensions: दीड महिन्याच्या शांततेनंतर इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. याच दरम्यान इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारा इशारा दिला आहे. इराणच्या मीडियानुसार, इराणचा रिव्होल्युशनरी गार्डने (IRGC) ट्रम्प यांचे आखाती, खाडी देशातील अनेक हॉटेल्स, टॉवर आणि गोल्फ क्लबसारख्या संपत्ती उद्धवस्त करण्याची योजना आखली आहे. ट्रम्प यांचे खाडी देशात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. त्या नष्ट करण्यात येणार आहेत. दोन्ही देशात सातत्याने तणाव वाढत आहे.

मध्य-पूर्वेतील ट्रम्प यांच्या मालमत्तांची यादीच समोर

इराणी मीडियानुसार, IRGC ने संयुक्त अरब अमिरात, सौदी अरब, कतार आणि ओमान या देशातील ट्रम्प ब्रँडच्या अनेक मालमत्तांची यादी तयार केली आहे. यामध्ये दुबईतील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल अँड रेसिडेन्शियल टॉवर, ट्रम्प इंटरनॅशनल ग्लोफ क्लब, जेद्दा येथील ट्रम्प प्लाझा टॉवर, रियाद येथील ट्रम्प टॉवर, सौदी अरबमधील ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लब, कतारमधील ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लब आणि विला सेमॅसमा आणि मस्कद येथील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलचा यामध्ये समावेश आहे.

कारवाईची टांगती तलवार

IRGC ने ट्रम्प यांची मालमत्ता निशाण्यावर असल्याचे जाहीर केले आहे. पण हा हल्ला केव्हा करणार याची माहिती इराणने स्पष्ट केलेली नाही. पण होर्मुज समुद्रधुनीतील तणाव जोपर्यंत अमेरिका निवळत नाही, तोपर्यंत इराण मागे हटणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इराणवर जर हल्ले वाढले तर मात्र आखाती देशातील ट्रम्प यांच्या मालमत्तांवर हल्ला करण्यात येऊ शकतो.

इराणच्या लष्कराचे प्रवक्ते इब्राहिम जोल्फाघारी यांनी सांगितले की इराणचे विद्युत निर्मिती प्रकल्प, विद्युत पारेषण केंद्र यांच्यासह पूल, मुख्य रस्ते यांच्यावर अथवा प्रमुख इमारतीवर हल्ला झाल्यास जशाच तसे उत्तर देण्यात येईल. अमेरिकेने होर्मुजमधील हस्तक्षेप तात्काळ थांबवण्याचे आवाहन इराणने केले आहे. अमेरिकेने मर्यादा ओलांडू नये असा इशारा IRGC ने दिला आहे.

तर दुसरीकडे इराणने चर्चेसाठी पुढे यावे आणि बैठकीत सहभागी व्हावे असे आवाहन अमेरिकेने केले आहे. जर इराण पुढे आला नाही तर हल्ले थांबणार नाहीत, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. इराणची लष्करी ताकद कमी करण्याचे लक्ष्य असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी