
जर्मन वर्तमानपत्र फ्रँकफर्टर ऑलगेमाइनने एक मोठा दावा केलाय. या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार ट्रम्प यांनी पीएम मोदींना चारवेळ फोन करण्याचा प्रयत्न केला. या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चारवेळा पीएम मोदींसोबत फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला. फ्रँकफर्टर ऑलगेमाइन वर्तमानपत्रानुसार, मोदी यांनी चारहीवेळा ट्रम्प यांच्यासोबत बोलण्यास नकार दिला. वर्तमानपत्राच्या दाव्यावर भारत सरकारकडून अजूपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. जर्मन वर्तमानपत्र एफएजेडने भारत-अमेरिका संबंधांचा आयाम आणि ऑपरेशन सिंदूर नंतर निर्माण झालेल्या वादावर विस्ताराने टिप्पणी केली आहे.
“अमेरिकेचे राष्ट्रपती ज्या लाजिरवाण्या पद्धतीने उपमहाद्वीपला आपली अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी मजबूर करत आहेत, त्यावरुन भारत सरकारच्या प्रमुखाला भूतकाळातील एका कडवट अनुभवाची आठवण येत असावी” असं जर्मन वर्तमानपत्राने म्हटलं आहे. फ्रँकफर्टर ऑलगेमाइनने लिहिलय की, “फेब्रुवारी महिन्यात अमेरिकी राष्ट्रपतींनी व्हाइट हाऊसमध्ये आपल्या पाहुण्याची महान नेता बोलून प्रशंसा केली होती” “आता ट्रम्प यांचे सूर बदलले आहेत.
म्हणून ट्रम्प यांची चिडचिड
त्यांनी भारतासारख्या गौरवशाली देशाला मृत अर्थव्यवस्था म्हटलं. “जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात अमेरिकेच्या एग्रीकल्चर कंपन्यांन एन्ट्री मिळत नाहीय, त्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांची चिडचिड दिसून येतेय” असं जर्मन वर्तमानपत्राने लिहिलय.
भारताची कूटनितीक सावधता
एफएजेडच्या मते, या घटनाक्रमात हैराण करणारी बाब म्हणजे ट्रम्पनी मोदी यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. पण भारताने नकार दिला, यावरुन त्यांचा राग दिसून येतो. पण भारताच्या व्यवहारातून त्यांची कुटनितीक सावधता सुद्धा दिसून येते असं जर्मन वर्तमानपत्राने लिहिलय.
मोदींना ट्रम्पच्या कुठल्या जाळ्यात फसायच नाहीय?
ट्रम्प यांनी याआधी अमेरिका आणि वियतनाममध्ये ट्रेड डीलची घोषणा केली होती. या व्यापार करारासाठी अमेरिका आणि वियतनामच्या प्रतिनिधी मंडळामध्ये सावधतेने चर्चा झाली होती. या दरम्यान ट्रम्प यांनी वियतनामचे नेते टो लाम यांच्यासोबत टेलिफोनवर चर्चा केलेली. पण कुठल्या करारापर्यंत येण्याआधीच ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यापार करार झाल्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रम्पच्या या जाळ्यात फसायचं नाहीय.