H-1B व्हिसाच्या पार्श्वभूमीवर गुगलचा कर्मचाऱ्यांना मोठा सल्ला, अमेरिका न…

H-1B Visa Rule Change : डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक असा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक टेक कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. हेच नाही तर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ अमेरिकेत बोलावण्याचा निर्णय देखील घेतला.

H-1B व्हिसाच्या पार्श्वभूमीवर गुगलचा कर्मचाऱ्यांना मोठा सल्ला, अमेरिका न...
H-1B visa
| Updated on: Sep 21, 2025 | 1:08 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर आता 88 लाख रूपये शुल्क आकारल्याने एकच खळबळ उडाली आहे. हेच नाही तर अमेरिकेतील टेक कंपन्या सर्तक झाल्याचेही दिसत आहे. मायक्रोसॉफ्ट, मेटा, अमेझॉन या कंपन्यानंतर थेट आता गुगलनेही आपल्या कर्मचाऱ्यांना मेल करत मोठा सल्ला दिला आहे. सर्वच कंपन्या आपल्या H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर अमेरिकेत परतण्याच्या आणि अमेरिकेच्या बाहेर न जाण्याच्या सूचना देत आहेत. आता असे झाले की, अमेरिकेतील कंपन्यांनाच ट्रम्प सरकारवर विश्वास राहिल नाही. ट्रम्प कधी काय निर्णय घेतील आणि आपल्या कर्मचाऱ्यांना अडचणीत आणतील, यावरून कंपन्या देखील अलर्ट मोडवर आहेत.

गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना मेल करून स्पष्ट सांगितले की, शक्य आहे तेवढ्या लवकर अमेरिकेत दाखल व्हा. गुगलने एक मेमो जारी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केला. हेच नाही तर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवस आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचाही थेट सल्ला दिला. शिवाय काही अडचण असेल किंवा कुठे कर्मचारी फसले तर त्यांना सपोर्ट टीमसोबत तात्काळ संपर्क साधण्याचा सल्ला देखील कंपनीने दिला आहे.

गुगलने मेलमध्ये म्हटले की, तुम्हाला अमेरिका सोडण्यात अडचणी येऊ शकतात किंवा तुम्हाला प्रवेश देखील नाकारला जाऊ शकतो. यादरम्यान काही गैरसोय देखील होऊ शकते. परंतू या काळात आम्ही तुमच्या पाठिंशी उभे आहोत. आम्ही सपोर्टसाठी पूर्णपणे तयार आहोत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि कोणतीही नवीन माहिती मिळताच अपडेट करू.कंपनीने पुढे म्हटले आहे की, जे कर्मचारी तात्काळ परत येऊ शकत नाहीत त्यांनी कंपनीच्या इमिग्रेशन सपोर्ट टीमशी संपर्क साधावा.

H-1B व्हिसाच्या नवीन नियमानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अगोदरच स्पष्ट केले की, हा नियम जे नवीन H-1B व्हिसा धारक आहेत जे अर्ज करणार आहेत, त्यांच्यासाठी हा नियम लागू झालाय. जे जुने आणि ज्यांच्याकडे अगोदरच H-1B व्हिसा आहे, त्यांना 88 लाख रूपये भरावे लागणार नाहीत. शिवाय 88 लाख रूपये दरवर्षी नाही तर फक्त एकदाच भरावे लागणार आहेत.