Sri Lanka crisis: गोटाबाया राजपक्षेंनी मालदीवही सोडलं; तेथून सिंगापूरला रवाना; श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर

| Updated on: Jul 14, 2022 | 2:54 PM

श्रीलंकेतील आंदोलकांनी राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे या दोघांना पद सोडण्याची त्यांनी मागणी केली होती त्याचवेळी त्यांच्या राजवाड्यावर आंदोलकांनी हल्ला केल्यावर त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेतील आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्या असून राजकीय नेत्यांची सरकारी निवासस्थानंत आम्ही रिकामी करणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.

Sri Lanka crisis: गोटाबाया राजपक्षेंनी मालदीवही सोडलं; तेथून सिंगापूरला रवाना; श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर
Follow us on

नवी दिल्लीः श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे, त्यामुळे श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa, President of Sri Lanka) हे मालदीवमधून सिंगापूरला रवाना (Departure from Maldives to Singapore) झाले असल्याची माहिती असोसिएटेड प्रेसकडून देण्यात आली आहे. श्रीलंकेहून (Sri Lanka) बुधवारी सकाळी श्रीगोटाबाया राजपक्षे, त्यांची पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह ते निघाले होते. त्यावेळी त्यांचे विमानतळावर मोहम्मद नशीद यांनी स्वागत केले. श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर गेली असून आंदोलकांनी आता राजकीय नेत्यांच्या घरावर कब्जा घेतला आहे. त्यामुळे ज्या दिवशी गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा सोपवायचा होता त्याच दिवशी त्यांनी देशातून पलायन केले.

 पायउतार होण्याचा निर्णय

श्रीलंकेतील आंदोलकांनी राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे या दोघांना पद सोडण्याची त्यांनी मागणी केली होती त्याचवेळी त्यांच्या राजवाड्यावर आंदोलकांनी हल्ला केल्यावर त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेतील आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्या असून राजकीय नेत्यांची सरकारी निवासस्थानंत आम्ही रिकामी करणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे सांगण्यात येत आहे.

 शांततेने पंतप्रधान कार्यालयातून माघार

यावेळीत त्यांच्या विरोधकांनी सांगिते की, आता आम्ही शांततेने राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालयातून माघार घेत आहोत, मात्र हा आमचा लढा आम्ही सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.

 लष्कराने आदेश नाकारले

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे या परिस्थिती जे आता कार्यवाहक अध्यक्ष आहेत, त्यांनी निदर्शने शांत करण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र श्रीलंकेतील लष्कराने त्यांचे आदेश नाकारले आहेत.

तात्काळ राजीनामा द्यावा

राजपक्षे यांचा राजीनामा देण्याची मुदत निघून गेली आहे, त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना त्या पदावर काढून टाकण्यासाठी इतर पर्यायांचा विचार केला जाईल असे श्रीलंकेचे सभापती महिंदा यापा अबेवर्देना यांनी सांगितले आहे.