
पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल संघर्ष खूप जुना आहे. त्यात हमास या दहशतवाद्यांच्या संघटनेने गाझा पट्टीत पाय रोवले आहेत. इस्त्राईल सोबत झालेल्या युद्धात या संघटनेचे कंबरडे मोडले. पण ओलीस ठेवलेल्या इस्त्राईली तरुणीने हमासच्या क्रुरतेचा चेहरा जगासमोर आणला. इलाना ग्रिचोव्स्क या तरुणीने तिच्यासोबतची आपबित्ती जगासमोर आणली. 7 ऑक्टोबर 2023 रोजी तिला ओलीस ठेवण्यात आले. तिला एका बाईकवरून गाझा पट्टीत नेण्यात आले. तिला शुद्ध आली तेव्हा ती एका खोलीत जमिनीवर पडलेली होती. तिच्या अंगावरील सर्व कपडे काढण्यात आलेले होते. तर हमासचे 7 बंदुकधारी तिच्यासमोर उभे होते.
पीरियड्समुळे बलात्कार नाही
द न्यूयॉर्क टाईम्सला ग्रिचोव्स्कने मुलाखत दिली. त्यात तिने घटनाक्रम सांगितला. बंदुकधारी समोर होते. ती वेदनेने कण्हत होती. आपल्याला पीरियड सुरू असल्याचे तिने सांगताच हमासचे दहशतवादी हसले. त्यांनी तिचे कपडे अंगावर फेकले आणि निघून गेले. त्यांचा इरादा बलात्कार करण्याचा होता. पण पीरियड असल्याने आपण वाचल्याचे तिने सांगितले.
मग तू केवळ मुलं पैदा कर
ग्रिचोव्स्कने तिच्यावरील छळाची कहाणी जगासमोर आणली. त्यानुसार तिला काही दिवस एका ठिकाणी ठेवण्यात आले. त्यानंतर तिचे ठिकाण बदलण्यात आले. तिला सांगण्यात आले की, तिचे लग्न हमासच्या सदस्यांशी करून देण्यात येईल. येथे ती आता केवळ मुलं पैदा करण्याचे काम करेल.
ज्यावेळी इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध विरामाची घोषणा झाली. त्यावेळी हमासचा एक दहशतवादी तिच्याकडे आला. त्याने इलाना जाऊ देणार नसल्याचे सांगितले. तो तिच्याशी लग्न करणार असल्याचे आणि तिला आता केवळ मूलचं पैदा करण्यासाठी ठेवणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने तिच्या हातातील बांगडी काढून घेतली.
नवरा अजूनही हमासच्या ताब्यात
इलाना ही कुटुंबासह मॅक्सिकोतून इस्त्रायलमध्ये स्थलांतरीत झाली. किबुत्ज शहरात ते स्थिरावले. इस्त्रायली तरुणाशी तिने लग्न केले. पतीसोबत मिळून त्यांनी कामाला सुरुवात केली. पण ऑक्टोबर महिन्यात हमासने किबुत्जवर हल्ला करून इलानाला पळवले. एक जण बाईक चालवत होता. तर दुसऱ्याने तिला धरून ठेवले होते. तिच्या पतीला पण हमासने ओलीस ठेवले आहे. त्या दोघांची एका कॅम्पमध्ये भेट पण झाली. त्याला हमासने अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण केली. तिचा पती अजूनही हमासच्या दहशतवाद्यांसमोर झुकलेला नाही. त्याची तिला चिंता वाटत आहे.