
प्रत्येक वर्षी 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिवसाची आठवण जागवली जाते. मानवी इतिहासातील हा सर्वात काळाकुट्ट दिवस आहे. 80 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेने केवळ जपानमधीलच नाही तर जगभरातील अनेकांना अनामिक भीती वाटते. याच दिवशी 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. या अणुबॉम्बने हे शहर बेचिराख झाले. या घटनेने मानवाला अणुबॉम्बचे परिणाम अधोरेखित केले. आता मानवतेचा ठेकेदार झालेल्या अमेरिकेला त्यावेळी जपानी लोकांची दया माया आली नाही. त्याने हिरोशिमावर अणुबॉम्बचा प्रयोग केल्यावर तीन दिवसांनी 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या शहरावर पण बॉम्ब टाकला. जग त्याने हादरले. मानव जात शहारली. ही चूक कळायला अमेरिकेला कित्येक वर्ष लागली. त्यांनी ही चूक झाल्याचे थेट मान्य केले नाही. पण संवेदना व्यक्त करायला ही पुढे कित्येक वर्षे खर्ची घातली. काय आहे हिरोशिमाची ती भयावह कहाणी? लिटिल बॉय हिरोशिमावर टाकण्यामागील कारण काय? सकाळीच आकाशातून...