जग हादरलं… होर्मुजवर पहिल्यांदाच चुंबक बॉम्बचा भयंकर हल्ला; थेट भारतीय टँकरवर निशाणा; भारताला मोठा धक्का

होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय तेल टँकर MT LOUISE 1 वर चुंबक बॉम्बने हल्ला झाला. या हल्ल्यात 27 भारतीय नाविक सुखरूप बचावले, पण जहाजाच्या इंजिन रूममध्ये आग लागली. फेब्रुवारीनंतर होर्मुजमध्ये झालेला हा पहिला यशस्वी लिंपेट माईन हल्ला आहे, जो भारतासाठी एक मोठा धक्का मानला जातो.

जग हादरलं... होर्मुजवर पहिल्यांदाच चुंबक बॉम्बचा भयंकर हल्ला; थेट भारतीय टँकरवर निशाणा; भारताला मोठा धक्का
Indian tanker limpet mine
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2026 | 11:56 PM

स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये सागरी जहाजांवरील हल्ल्याचा धोका वाढतच चालला आहे. 30 ऑक्टोबर रोजी पनामाचे झेंडा असलेला भारतीय तेल टँकर MT LOUISE 1 वर लिंपेट माइन्स (चुंबक बॉम्ब)ने हल्ला करण्यात आला आहे. या तेल टँकरमधून 27 भारतीय प्रवास करत होते. हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रुममध्ये भीषण आग लागली. त्यामुळे टँकरने काही काळ काम करणं बंद केलं होतं. दरम्यान, या भीषण हल्ल्यातून सर्वच्या सर्व भारतीय नाविक सुदैवाने बचावले आहेत. केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान, हा हल्ला म्हणजे भारतासाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

फेब्रुवारीपासून अमेरिका-इराण युद्ध सुरू आहे. या युद्धानंतर होर्मुजमध्ये चुंबक स्फोटकांचा वापर करून केलेला हा पहिला यशस्वी हल्ला आहे. हल्ला करण्यासाठी एक छोटी नाव टँकरच्या जवळ आली. आणि टँकरच्या बाहेरच्या भागाला दोन लिंपेट माइन्स चिपकवून निघून गेली. त्यानंतर जहाजाला आग लागली. क्रू मेंबर्सनी ही आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. किंवा कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच समुद्रात तेल पसरल्याचंही वृत्त नाहीये. आग विझवल्यानंतर टँकरने आपला प्रवास सुरू केल्याचं वृत्त आहे.

Loading...

 

आधीही एका टँकरवर हल्ला

दरम्यान, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या हल्ल्याची माहिती दिली. 29 ऑक्टोबर रोजी म्हणजे भारतीय टँकरला लक्ष्य बनवण्याच्या एक दिवस आधी. लायबेरियाचा झेंडा असलेल्या MT ARZANAH या मोठ्या तेल टँकरवरही होर्मुज प्रोजेक्टाइलने हल्ला करण्यात आला होता. या जहाजातून दोन भारतीय नागरिक प्रवास करत होते. ते सुरक्षित आहेत. म्हणजे दोन दिवसात 29 भारतीय नागरिक जीवघेण्या हल्ल्यातून बचावले आहेत, असं सर्बानंद यांनी सांगितलं. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जहाज व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांसोबत आम्ही संपर्कात आहोत. भारतीय नाविकांची सुरक्षा आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी संपर्कात असल्याचं सर्बानंद म्हणाले.

लिंपेट माइन्स काय असतं?

लिंपेंट माइन्स छोट्या आकाराचे एक स्फोटक उपकरण असतं. चुंबकच्या मदतीने जहाजाच्या बाहेरच्या भागावर ते चिपकवलं जातं. 2017पासून याचा वापर केला जात आहे. हे स्फोटक स्वस्तात मिळतात आणि सहज उपलब्ध होतात. छोट्या होडीच्या माध्यमातून कोणत्याही जहाजावर हे चिपकवून सहज निघून जाता येतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us