अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या आजाराने त्रस्त? किती धोकादायक आहे हा आजार?

क्रॉनिक व्हेनस इन्सफिशिएन्सी आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पायांमध्ये सूज येणे, थकवा जाणवणे, त्वचेला खाज सुटणे किंवा मुंग्या येणे यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये त्वचेचा रंग बदलू शकतो, पायांवर अल्सर किंवा फोड देखील दिसू शकतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या आजाराने त्रस्त? किती धोकादायक आहे हा आजार?
Donald Trump
| Updated on: Jul 18, 2025 | 1:06 PM

Donald Trump Diagnosed With CVI: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प क्रॉनिक व्हेनस इन्सफिशिएन्सी (Chronic Venous Insufficiency) आजारासोबत लढा देत आहे. ट्रम्प यांच्या पायांना सूज आली आणि त्यांना दुखापत झाली होती. यामुळे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत सीव्हीआय आजाराचे निदान झाले, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली. ट्रम्प यांच्या या आजाराची बातमी आल्यावर या आजाराबद्दल सर्वांना जाणून घ्यायचे आहे.

सीव्हीआय नेमका आहे काय?

क्लीवलँड क्लीनिकच्या रिपोर्टनुसार, क्रॉनिक व्हेनस इंसफिशिएन्सी या आजारात पायांच्या नसा रक्त परत हृदयात योग्यरित्या वाहून नेऊ शकत नाही. सामान्यतः रक्तवाहिन्यांमध्ये लहान व्हॉल असतात. ज्यामुळे रक्त हृदयाकडे वाहून नेले जाते. जर हे व्हॉल खराब झाले किंवा कमकुवत झाले तर रक्त ह्रदयाकडे जाण्याऐवजी परत खाली वाहू शकते आणि पायांमध्ये जमा होऊ शकते. त्याला सीव्हीआय परिस्थिती म्हटले जाते. त्यामुळे पायांच्या नसांवर दबाव वाढतो. पायांमध्ये सूज येते. तसेच अल्सर होण्याचा धोका असतो. हा आजार धोकादायक नाही, परंतु त्यामुळे खूप वेदना होतात.

व्हाइट हाउसच्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना हा आजार नियमित हात मिळवण्याची सवय आणि एस्पिरिनचा वापर केल्यामुळे झाला. ट्रम्प एस्पिरिनचा औषधाचा वापर कार्डियोवॅस्कुलर आजारापासून वाचण्यासाठी करतात. सीव्हीआय हा एक प्राणघातक आजार नाही, तर वयानुसार होणारी समस्या आहे. ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो.

काय आहेत लक्षणे

आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पायांमध्ये सूज येणे, थकवा जाणवणे, त्वचेला खाज सुटणे किंवा मुंग्या येणे यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये त्वचेचा रंग बदलू शकतो, पायांवर अल्सर किंवा फोड देखील दिसू शकतात. यावर उपचार केले नाही तर हा आजार जास्त वेदनादायक होतो.

आजार पूर्ण बरा होतो का?

सीव्हीआय आजार उपचाराने पूर्णपणे बरा करता येत नाही. परंतु त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यासाठी नियमित चालणे, पाय उंच ठेवणे या उपचारांचा समावेश आहे. कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज वापरल्याने नसांवर दबाव येतो, ज्यामुळे रक्त प्रवाह सामान्य होतो. एंटीबायोटिक्स, रक्त पातळ करण्याची औषध यासारख्या औषधांनी त्यावर नियंत्रण मिळवता येते.