AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलने इराणमध्येच कसा रचला हनियाच्या हत्येचा कट, मोठी माहिती आली समोर

Ismail Haniyeh dead : इस्माईल हनिया याची इराणमध्ये हत्या झाल्यानंतर आता इराण सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. त्यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी अनेकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये गेस्ट हाऊस मध्ये काम करणाऱ्या लोकांचा देखील समावेश आहे.

इस्रायलने इराणमध्येच कसा रचला हनियाच्या हत्येचा कट, मोठी माहिती आली समोर
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 03, 2024 | 7:50 PM
Share

हमास प्रमुख इस्माईल हनिया याच्या हत्येनंतर इराण सरकार आता कारवाई करताना दिसत आहे. कारण हनिया हा इराणचा पाहुणा होता. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तो इराणमध्ये आला होता. पण त्याच इराणमध्ये त्याची हत्या करण्यात आला. त्यानंतर आता इराण सरकार आणि एजन्सी या हत्येच्या तपास करत आहे. या हत्येत कोणाकोणाचा हात आहे याचा तपास सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, लष्करी अधिकारी आणि तेहरानमधील लष्कर संचालित गेस्ट हाऊसमधील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती मिळत आहे. ज्या गेस्ट हाऊसमध्ये हानियाची हत्या करण्यात आली होती. तेथील अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.

इराणचा होता पाहुणा

हनिया हत्या प्रकरणामुळे तीन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कारण हनिया हा इराणचा पाहुणा होता. कतरमध्ये तो राहायचा. पण इस्रायलने त्याची तिसऱ्या देशात हत्या केल्यानं तणाव वाढला आहे. इराणने या हत्येचा बदला घेणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे इस्रायल देखील अलर्टवर आहे. इराणने इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) वर तपासाची जबाबदारी सोपवली आहे. तेहरानमध्ये हानियाच्या हत्येमुळे इराणच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसलाय. या घटनेनंतर इराणची सुरक्षा यंत्रणा कमकुवत असल्याची ठपका लागला आहे. इस्लामिक देशात विदेशी गुप्तचर यंत्रणा घुसल्याचा दावाही केला जातोय.

इस्रायल कोणत्याही देशात जावून ऑपरेशन करु शकतो असा संदेश यातून जात आहे. जे या इस्लामिक राष्ट्रांना मंजूर नाही. इस्रायलला रोखण्यासाठी अनेकदा हे देश एकत्र आले पण त्यांना इस्रायलचा सामना करता आलेला नाही. असं असलं तरी ज्यू राष्ट्र इस्रायलने अद्याप हनियाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण, हा हल्ला इस्रायलने केल्याचा दावा इराण आणि हमास करत आहेत.

असा आखला हत्येचा प्लान

हनियाची हत्या करण्यासाठी मोठा प्लान आखण्यात आला होता. कोणालाही याची कल्पना नव्हती. बाहेरुन क्षेपणास्त्र खिडकीच्या माध्यमातून खोलीत सोडण्यात आले. ज्यामध्ये हनिया आणि त्याच्या एका रक्षकांना मृत्यू झाला. हमास आणि इराण यांनी याचा आरोप इस्रायलवर लावला आहे. इराणच्या धर्तीवर झालेल्या हा हत्याकांडाने हमास आणि इस्रायला मोठा धक्का बसला आहे. कारण एत तिसरा देश त्यांच्याच देशात येऊन शत्रूला मारुन जातो हे काय त्यांना पचनी पडत नाहीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हानिया येणाच्या दोन महिन्यांआधीच व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये स्फोटके पेरण्यात आली होती, असे अमेरिकेने म्हटले आहे. म्हणजे हनिया येथे येणार हे शत्रूला आधीच माहित होते. यानंतर रिमोट कंट्रोलचा वापर करत क्षेपणास्त्र डागण्यात आले होते.

हानियाच्या हत्येनंतर इराणी अधिकाऱ्यांनी आधी गेस्ट हाऊसवर छापा टाकला. इमारतीत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना अटक करून त्यांच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू सील करण्यात आल्या आहेत. हनियाची हत्या झालेल्या तेहरानमधील या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची ही पहिलीच वेळ नव्हती.

सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू आहे

जेव्हा हनिया हे तेहरानला यायचे तेव्हा ते याच गेस्ट हाऊसमध्ये राहायचे. ही गोष्ट त्यांच्या शत्रूला आधीच माहित होती. म्हणून आधीच प्लान आखण्यात आला होता. आता या प्रकरणात सीसीटीव्ही तपासले जात आहेत. ज्यांच्यावरही शंका आहे त्यांना अटक केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या हत्येमागे मोसाद एजंट्सची ओळख पटवली जाईल.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?