भारताच्या दौऱ्यावर आलेले तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी किती शिकले आहेत ?

Amir Khan Muttaqi Education : भारताच्या दौऱ्यावर आलेल्या तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांचे शिक्षण नेमके किती झाले आहे.

भारताच्या दौऱ्यावर आलेले तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी किती शिकले आहेत ?
amir khan muttaqi education
| Updated on: Oct 13, 2025 | 9:30 PM

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी ( Amir Khan Muttaqi ) भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याने पाकिस्तानला पोठशुळ उठला आहे. ते ९ ते १६ ऑक्टोबरपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा यासाठी महत्वाचा आहे कारण तालिबान सरकारच्या कोणा मंत्र्याने पहिल्यांदाच भारताचा दौरा केलेला आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे ( तालिबान सरकार )  संबंध पुन्हा रुळांवर येण्याचा प्रयत्न म्हणूनही या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.

परंतू तुम्हाला माहिती आहे का तालिबानचे परराष्ट्र मंत्री किती शिकलेले आहेत ? चला तर पाहूयात…आमिर खान मुत्तकी यांची कहाणी एका छोट्या खेड्यातून सुरु झाली असून ते तळागाळातून अफगाणिस्तानच्या सत्तेपर्यंत पोहचले आहेत. आमिर खान मुत्तकी यांचा जन्म ७ मार्च १९७० मध्ये हिल्मंद प्रांताच्या नद अली जिल्ह्यातील जरगुन गावात झाला होता. त्यांच्या वडीलांचे नाव हाजी नादिर खान होते. मुत्तकी मूळचे पक्तिया प्रांतातील रहाणार होते. नंतर त्यांचे कुटुंब हिल्मंद येथे स्थायिक झाले.

बातम्यानुसार आमिर खान मुत्तकी यांनी सुरुवातीचे शिक्षण आपल्या गावातील मदरसा ( मशिदीत ) घेतले. येथे त्यांनी इस्मामी आणि पारंपारिक धार्मिक ज्ञानाचा अभ्यास सुरु केला. त्याकाळात अफगाणिस्तानात राजकीय अस्थिरता आणि संघर्षाचा काळ होता. परंतू त्यांचे शिक्षण सुरुच राहिले.

पाकिस्तानात आश्रय आणि शिक्षण

१९७९ मध्ये अफगाणिस्तानात कम्युनिस्ट शासन आणि सोव्हीएतचे आक्रमणानंतर त्यांच्या कुटुंबाला देश सोडावा लागला. केवळ ९ वर्षांचे असताना आमिर खान मुत्तकी पाकिस्तानात आश्रयाला गेले. तेथे त्यांनी अफगाण शरणार्थ्यांच्या धार्मिक शाळेत शिक्षण घेतले. येथील मदरसात त्यांनी कुराण, हदीस, फिक्ह आणि अन्य इस्लामी विषयांचे शिक्षण घेतले. हळूहळू ते धार्मिक शिक्षणात निपुण होत गेले. आणि त्यांच्या समुदायातील एक मान्यवर म्हणून ओळखले जाऊ लागले.

मुत्तकी यांनी सोव्हीएत समर्थित सरकारच्या विरोधातील लढाईत त्यांनी भाग घेतला. त्यांनी हेलमंद प्रांतातील चालू असलेल्या संघर्षात सक्रीय रुपाने सहभाग घेतला. डॉ.नजीबुल्ला यांचे सरकार कोसळल्यानंतर मुत्तकी आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याच्या मागे लागले.

प्रमुख प्रवक्ते आणि मुत्सदी राजकारणी

आमिर खान मुत्तकी केवळ एक धार्मिक विद्वान नाहीत तर एक अनुभवी राजकीय नेते देखील आहेत. त्यांनी तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर यांच्या आदेशाने अनेकदा आंतरराष्ट्रीय परिषदात आपल्या देशाची बाजू मांडली आहे.