‘मी घड्याळ घालत नाही…’, Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण, तुमचेही डोळे खाडकन् उघडतील..

वास्तविक साल २०२४ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या १२८ व्या दीक्षांत समारंभात संबोधन करताना जेन्सन हुआंग यांनी ते घड्याळ का घालत नाहीत याचे गुपित सांगितले...काय आहे या मागचा नेमका फंडा...

मी घड्याळ घालत नाही..., Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण, तुमचेही डोळे खाडकन् उघडतील..
Nvidia - CEO - Jensen Huang
| Updated on: Jun 29, 2026 | 11:26 PM

जगातील सर्वात मोठी टेक कंपनीपैकी एक असलेल्या Nvidia या कंपनीचे बाजारमुल्य $4.68LCr आहे. या कंपनीला चालवणारे म्हणजे याचे सीईओ जेन्सन हुआंग ( Jensen Huang ) आहेत.जेन्सन हुआंग नेहमीच त्यांच्या अनोख्या अंदाजासाठी ओळखले जातात. मग त्यांचे ते ब्लॅक लेदर जॅकेट परीधान करणे असो की घड्यान घालणे असो. ते घड्याळ का घालत नाहीत यामागे त्यांचा विचार काय आहे हे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले आहे.

जेन्सन हुआंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाचा किस्सा सांगितला. एकदा ते कुटुंबासह जपानच्या क्योटो शहरातील एक प्रसिद्ध गार्डनला पाहायला गेले होते. त्यावेळी उष्णता जास्त होती.त्यांनी पाहिले की एक बुजुर्ग माळी गुडघ्यावर बसुन एका छोट्या चिमट्याने सुखलेले गवत आणि गवतावर जमलेला थर काढून टोपलीत टाकत होता. हे पाहून आपण आश्चर्यचकीत झालो. कारण बाग खूपच मोठी होती आणि माळीकडील उपकरण एकदमच छोटे होते. त्यामुळे आपल्याला न राहवल्याने आपण त्याला व्यक्तीला विचारले की ही बाग एवढी मोठी आहे आणि तुमचा चिमटा खूपच छोटा आहे. मग तुम्ही एकट्याने एवढ्या मोठ्या बागेची देखभाल कशी करणार ? तेव्हा त्या माळ्याने शांतपणे उत्तर दिले की माझ्याकडे भरपूर वेळ आहे.

घड्याळ न घालण्याचे खरे कारण ?

माळ्याच्या या छोट्या वाक्याने हुआंगचा यांचा विचार बदलला. त्यांना जाणवले की जर तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करत असाल आणि त्यात संपूर्णपणे व्यग्र होत असाल तर वेळ आणि साधनांची कमतरता तुम्हाला कधी जाणवणार नाही.

या घटनेने प्रेरित होत आपण जीवनातून घड्याळाला कायमचे हटवले. हुआंग यांनी सांगितले की मी घड्याळ घालत नाही कारण माझ्यासाठी वर्तमानच सर्वात महत्वाचा वेळ आहे. स्वत:ला वर्तमानाला समर्पित करणे हाच माझा मंत्र आहे.

जेव्हा तुम्ही वारंवार घड्याळ पाहात असता. तेव्हा वेळेची कमतरता आणि डेडलाईनच्या दबावात येता. हा दबाव तुम्हाला मोकळे पणाने विचार करणे आणि चांगले काम करण्यापासून रोखतो. हुआंग यांच्या मते डेडलाईनला एक ओझे म्हणून न पाहाता, जर तुम्ही वर्तमानात सुरु असलेल्या कामावर संपूर्ण फोकस कराल तर काम आपोआप वेळेवर आणि चांगल्याप्रकारे पूर्ण होईल.

कामावर फोकस करणे गरजेचे

आजच्या काळात जेथे कंपन्या आणि लोक सतत भविष्याची चिंता करत असतात.तेथे हुआंग यांचा विचार एकदम वेगळा आहे. ते आपल्या यशाला तीन गोष्टी जबाबदार असल्याचे मानतात.

पहिली – भविष्यात चिंता करण्याच्या ऐवजी समोर आहे. त्याला योग्य रितीने करा. आजचे चांगले कामच तुमचे चांगले भविष्य निश्चित करते.

दूसरी- हुआंग यांचे म्हणणे आहे की ते संधी किंवा खूप जास्त विकासाच्या मागे धावत नाही. त्यांचे सर्व लक्ष त्यांचे प्रोडक्टला बेस्ट बनवण्यावर असते. संधी स्वत: त्यांच्याकडे चालत येते.

तिसरी – त्यांनी तरुणांना सल्ला दिला आहे की प्रत्येक दिवशी नवीन काही शिका. आपल्या कामाचा आनंद घ्या आणि परिणामाची चिंता न करता स्वत:चे शंभर टक्के प्रयत्न द्या.

 

Follow Us