येथे इराण युद्ध थांबले, तेथे युक्रेनने रशियाचे ऑईल पोर्ट उडवले, भारताला मोठा धक्का

एकीकडे इराणवरील संभाव्य हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवसांसाठी पुढे ढकलेले असताना तिकडे भारताला तेल मिळत असलेल्या रशियाच्या बंदरावर युक्रेनने हल्ला चढवला आहे.

येथे इराण युद्ध थांबले, तेथे युक्रेनने रशियाचे ऑईल पोर्ट उडवले, भारताला मोठा धक्का
PUTIN AND MODI
| Updated on: Mar 23, 2026 | 8:18 PM

एकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष इराण युद्धाकडे लागले असताना त्याच वेळी युक्रेनने बाल्टिक सागरातील रशियाच्या सर्वात मोठ्या ऑईल एक्सपोर्ट टर्मिनल प्रिमोर्स्कला उडवले आहे. या हल्ल्यानंतर येथील इंधन टाक्यांमधून धुराचे लोट उटले आहेत. आणि कर्मचाऱ्यांना तेथून सुरक्षित काढले जात आहे. आणि आग विझवण्याचे काम सुरु आहे. मात्र,चिंतेचे कारण हे आहे की येथून भारताला तेलाचा पुरवठा केला जातो.

मॉस्को टाईम्सच्या वृत्तानुसार रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की युक्रेनने रविवारी रात्रभर २४९ ड्रोन डागले. एकट्या लेनिनग्राडच्या आकाशात ७० हून अधिक ड्रोन उडवून नष्ट करण्यात आले. मात्र, काही ड्रोन बाल्टिक समुद्राच्या कच्चे तेल लोडींग करणाऱ्या सर्वात मोठ्या बंदरात कोसळले. प्रिमोर्स्कहून दर दिवशी १५ लाख बॅरल तेल आणि पेट्रोलियम प्रोडक्टचे प्रोसेस होते. हा बाल्टिक पाईपलाईन सिस्टीमचा एण्डपॉईंट आहे. हेच कारण आहे की येथून रशियाच्या युराल्स क्रुडच्या बहुतांश भागाला पुरवठा केला जातो. तज्ज्ञांच्या मते भारतालाही येथूनच तेलाचा पुरवठा केला जातो. मात्र हल्ल्यानंतर प्रिमोर्स्क आणि जवळच्या उस्त-लुगा बंदर या दोन्हींना बंद करण्यात आले आहे.

कसे येते भारतात तेल –

तज्ज्ञांच्या मते रशियाच्या बाल्टिक पोर्टमधून तेल काढले जाते. नंतर जहाजाने युरोप वा मेडिटेरेनियन द्वारे सुएझ कालव्यातून नंतर लाल समुद्र आणि अरबी समुद्र पार करत हे तेल भारतात पोहचते. या मार्गाने भारताला तेलाचे टँकर मिळण्यास ३० ते ४० दिवस लागतात.

इराणने होर्मुझ आधीच बंद केली आहे. येथून रोज २ कोटी बॅरल तेलाची वाहतूक होते. आता प्रिमोर्स्कची देखील भर पडली आहे. बाल्टिक सागरात प्रतिदिन १ ते १.५ दशलक्ष बॅरल तेलाचे काम आता ठप्प झाले आहे. जगातील दोन मोठे ऑईल चोकपॉईंट एकाच वेळी ठप्प झाले आहेत. यामुळे आणखीनच तेल संकट वाढण्याची शक्यता आहे.

हल्ल्याचे टायमिंग खतरनाक

या हल्ल्याचे टायमिंग खतरनाक आहे. इराणच्या वीज प्रकल्पांवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा ४८ तासांचा अल्टीमेटम होता. इराणने मात्र इशारा दिला की जर या अल्टीमेटमवर पावले उचलली तर तो होर्मुझ सामुद्रधुनी कायमची बंद करुन टाकेल आणि सर्व क्षेत्रीय ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करुन त्यांना नष्ट करेल. सौदी अरामको आशियाई खरेदीदारांना सांगत आहे की त्यांनी लाल समुद्रातील बायपास बंदराद्वारे एप्रिलच्या अंशत: पुरवठ्यास तयार राहावे, ज्यावर इराणच्या मिसाईलनी आधीच हल्ले केले आहेत. आता रशियाच्या बाल्टीक क्रुड पाईपलाईनच्या टर्मिनलवर एक फ्युईल टँक पेटलेला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us