
मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेमध्ये कमालीचा तणाव बघायला मिळतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याचे हा टॅरिफ लावल्याचे अमेरिकेने सांगितले आहे. भारताने शेवटपर्यंत अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. आता सातत्याने भारताला धमकावले जात आहे. दुसरीकडे जगातील अनेक देश हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दादागिरीच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एखाद्या हत्याराप्रमाणे वापरत असल्याचा सर्वांचा आरोप आहे. भारत, चीन आणि रशिया अमेरिकेच्या विरोधात एकवटतांना दिसले. तिन्ही देशांच्या नेत्यांमध्ये नुकताच मुलाखत झाली.
भारत, रशिया आणि चीन एकत्र आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची घाबरगुंडी उडाल्याचे बघायला मिळतंय. आता त्याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प हे दक्षिण कोरियाच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. दक्षिण कोरियाला आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेला ते उपस्थित राहण्याचे संकेत आहेत. या शिखर परिषदेत ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील द्विपक्षीय चर्चा देखील होऊ शकते. सध्याच अमेरिकेने चीनवर टॅरिफ लावला नाही. 90 दिवसांचा वेळ देण्यात आलाय. मात्र, असे असले तरीही चीन देखील अमेरिकेच्या विरोधात आहे.
रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात काही विषयावर चर्चा देखील होऊ शकते. भारताच्या विरोधात मोठा कट तर नाही ना ही शंका उपस्थित केली जात आहे. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. ट्रम्प त्यांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यादरम्यान इतर कोणत्याही देशाला भेट देतील की नाही हे अजून स्पष्ट नाहीये. ट्रम्प त्यांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांना भेटू शकतात. ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दाैरा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताचा नियोजित दाैरा सप्टेंबर महिन्यात होता. मात्र, सध्याच्य टॅरिफच्या तणाव डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा दाैरा रद्द केला. हेच नाही तर अमेरिकेत होणाऱ्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी होणार होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी देखील आपला हा दाैरा रद्द केला.