AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता सुट्टी नाहीच…डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचे सडेतोड उत्तर, थेट दाखवला आरसा, अमेरिकेलाच…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. हेच नाही तर अमेरिकेतून सातत्याने भारताबद्दल भडकावून विधाने केली जात आहेत. आता भारताकडून थेट उत्तर अमेरिकेला देण्यात आले आहे.

आता सुट्टी नाहीच...डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचे सडेतोड उत्तर, थेट दाखवला आरसा, अमेरिकेलाच...
Donald Trump
| Updated on: Sep 07, 2025 | 7:36 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार पीटर नवारो हेभारताबद्दल सातत्याने आग ओकताना दिसत आहेत. त्यांनी आतापर्यंत भारतावर काही गंभीर आरोप केली. पीटर नवारो यांनी म्हटले, भारताच्या टॅरिफमुळे अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. भारत हा फक्त नफेखोरीसाठी रशियाकडून तेल खरेदी करतोय. काहीही झाले तरीही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे आणि युक्रेनच्या लोकांचा जीव घेणे थांबावे. पीटर यांच्या भडकावू विधानांना भारत दुर्लक्ष करताना दिसला. मात्र, आता भारताकडून नवारो यांनी जोरदार उत्तर देण्यात आलंय.

भारताने आता पीटर नवारो यांना कोंडीत पकडत थेट वस्तूस्थिती एक्सवर सांगितलीये. भारताची तेल आयात ऊर्जा सुरक्षेशी संबंधित आहे आणि ती कोणत्याही आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करत नाही, असे स्पष्ट उत्तर त्यांना दिली. पुढे म्हटले की, पीटर यांच्या दाव्याचा फॅक्ट चेक केला. कम्युनिटी नोटमध्ये लिहिले की रशियाकडून भारताची तेल आयात ही फक्त नफ्यासाठी नाही. उलटे हे ऊर्जा सुरक्षेसाठी आहे. मुळात म्हणजे यातून कोणत्याही आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन होत नाही.

पुढे लिहिण्यात आले की, भारत काही टॅरिफ (शुल्क) आकारत असला तरीही अमेरिकेचा भारतासोबत सेवांमध्ये व्यापार अधिशेष आहे. अमेरिका स्वतः रशियाकडून काही वस्तू आयात करते, यातून तुमचे दुटप्पी धोरण थेटपणे पुढे येते. हेच नाही तर भारताच्या या नोटनंतर नवारोने थेट कम्युनिटी नोटला कचरा म्हटले आहे. एलोन मस्कवर आता त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी लोकांच्या पोस्टमध्ये प्रचार घुसवू दिल्याचा आरोप केला आहे.

काल डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले. नरेंद्र मोदी यांनी  डोनाल्ड ट्रम्प यांना प्रतिसाद दिला. मात्र, आता भारत देखील अमेरिकेसारख्याच भूमिकेत असल्याचे बघायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून पीटर नवारो हे भारताच्या विरोधात वादग्रस्त विधाने करताना दिसत आहेत, आता त्यांना जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आहे. पीटर नवारो यांचे आरोप भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ते निराधार आणि दिशाभूल करणारे म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत थेट रशियाकडून भारताची तेल आयात पूर्णपणे ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक सुरक्षेसाठी आहे, असे स्पष्ट म्हटले.

Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...