भारतामुळेच अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, ट्रम्प सरकारचा खळबळजनक आरोप, म्हणाले, त्यांना कधीच..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वरिष्ठ सल्लागाराने भारतावर आता पुन्हा एकदा धक्कादायक आणि गंभीर आरोप केला आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. भारतावर फक्त टॅरिफच नाही तर गंभीर आरोप हे अमेरिकेकडून होताना दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयानंतर भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध आता ताणले गेले आहेत. दोन्ही देशातील व्यापार चर्चा आता जवळपास बंद झाली. भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. इतका मोठा टॅरिफ वाढवल्याने नफा मिळत नसून उलट नुकसान होत आहे. त्यामध्येच अमेरिकेतून भारताबद्दल चुकीचे दावे केली जात आहेत. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेची पोटदुखी उठली. रशियाकडून भारताने कच्चे तेल खरेदी बंद करावे, याकरिता दबाव टाकला जात आहे. भारताने अमेरिकेच्या या दबावाला भीक घातली नाही.
आता भारताबद्दल धक्कादायक दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराकडून करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारताबद्दल आग ओकली आहे. पीटर नवारो यांनी म्हटले की, भारताच्या टॅरिफमुळे अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, ही वस्तूस्थिती आहे. भारत हा फक्त आणि फक्त नफेखोरीसाठी रशियाकडून तेल खरेदी करतोय.
यातून रशिया युद्धासाठी लागणाऱ्या मशिन खरेदी करतो आणि यामध्ये युक्रेन आण रशियाचे लोक मारले जात आहेत. दुसरीकडे अमेरिकेतील टॅक्स भरणाऱ्या लोकांवर याचे ओझे पडत आहे. मुळात म्हणजे असे आहे की, भारत खरी गोष्ट स्वीकारत नाही आण फक्त प्रचार करत राहतो. ही पहिली वेळ नाही की, भारताबद्दल नवारो यांनी असे आरोप केले. यापूर्वीही त्यांनी काही धक्कादायक आरोप हे भारतावर केली आहेत.
मोदीचे युद्ध देखील त्यांनी म्हटले होते. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा शांतीचा रस्ता हा भारताहून जातो, असा दावा त्यांनी केला होता. त्यामध्येच आता त्यांनी अमेरिकेतील जाणाऱ्या नोकऱ्यांना देखील भारत जबाबदार असल्याचे म्हटले. मागील काही दिवसांपासून अमेरिकेत नोकऱ्या या मोठ्या प्रमाणात जात आहेत. त्यालाही भारतच कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डोनाल्ड ट्रम्प हे एकीकडे भारताचे काैतुक करतात आणि दुसरेकडे त्यांचे वरिष्ठ सल्लागार हे भारताबद्दल अशाप्रकारची चुकीची आणि खोटी विधाने करताना दिसतात.
