AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: एपस्टीनचे धक्कादायक कांड, नव्या व्हिडीओंनी खळबळ, चक्क बायकांच्या मागे लागून…

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एपस्टिनचे काही नवे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहून खळबळ माजली आहे.

Video: एपस्टीनचे धक्कादायक कांड, नव्या व्हिडीओंनी खळबळ, चक्क बायकांच्या मागे लागून...
JeffryImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 01, 2026 | 6:37 PM
Share

अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली जेफ्री एप्स्टीनला अटक करण्यात आली. आता सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जेफ्री एपस्टीन हे दोन मुलींसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ खरा आहे की एआय आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तो किचनमध्ये दोन महिलांसोबत दिसत आहे. आजूबाजूला काही महिला धावताना दिसतोय आणि सर्वजण हसताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये महिलांचा चेहरा ब्लर केला गेला आहे. तसेच त्यांचा त्या कोण आहेत हे दाखवलेले नाही. दुसऱ्या व्हिडीओमध्ये जेफ्री एपस्टीन एका महिलेसोबत नाचताना दिसतोय.

हे व्हिडीओ कसे समोर आले?

शुक्रवारी अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने जेफ्री एपस्टीनशी संबंधित सुमारे 30 लाख दस्तऐवज सार्वजनिक केले आहेत. यात हजारो व्हिडीओ, फोटो, एफबीआय इंटरव्ह्यू समरी आणि ईमेल यांचा समावेश आहे. याच दस्तऐवजांमधून हे व्हिडीओ समोर आला आहे. एपस्टीनचा संबंध अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील अनेक नेते आणि हस्तींशी (भारतातील काही नावांसह) जोडला गेला आहे.

जेफ्री एपस्टीन कोण होता?

जेफ्री एपस्टीन १९७० मध्ये न्यूयॉर्कच्या डाल्टन स्कूलमध्ये शिक्षक होता. नंतर त्याने बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला आणि स्वतःची कंपनी सुरू केली. त्याने मोठ्या क्लायंट्सची संपत्ती हाताळली. त्याने फ्लोरिडा, न्यू मेक्सिको आणि न्यूयॉर्कमध्ये आलिशान मालमत्ता विकत घेतल्या. त्याच्या पार्ट्यांमध्ये ट्रम्पसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती येत असत. २००५ मध्ये एका १४ वर्षांच्या मुलीच्या आई-वडिलांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली की, पाम बीचवरील त्याच्या घरात तिचे लैंगिक शोषण झाले. त्यानंतर छाप्यांमध्ये त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध झाला. अनेक पीडितांनी धक्कादायक साक्ष दिल्या. ६ जुलै २०१९ रोजी त्याला न्यूयॉर्क विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर शोषण आणि सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप होते. १० ऑगस्ट २०१९ रोजी जेलमधील सेलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या नव्या दस्तऐवज आणि व्हिडीओंमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

Follow Us
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?.
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्.
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा.
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं.
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर....