इम्रान खानचा थयथयाट, भारताला अणुयुद्धाची धमकी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan addresses Pakistan) यांचा संयम सुटला आणि त्यांनी (Imran Khan addresses Pakistan) पुन्हा एकदा भारताला अणुयुद्धाची धमकी दिली. पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना इम्रान खानने स्वतःची कामगिरी सांगण्याचा प्रयत्न केला.

इम्रान खानचा थयथयाट, भारताला अणुयुद्धाची धमकी

इस्लामाबाद : काश्मीर प्रश्नी पाकिस्तानने जागतिक व्यासपीठावरील प्रत्येक नेत्याकडे मदत मागितली. पण चीनचा अयशस्वी प्रयत्न सोडता एकाही देशाने मदत केली नाही. त्यात फ्रान्समधील G-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खेळीमेळीत झालेली चर्चा पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan addresses Pakistan) यांचा संयम सुटला आणि त्यांनी (Imran Khan addresses Pakistan) पुन्हा एकदा भारताला अणुयुद्धाची धमकी दिली. पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना इम्रान खानने स्वतःची कामगिरी सांगण्याचा प्रयत्न केला.

सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण बनली आहे. त्यामुळे इम्रान खानने जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. काश्मीरचा मुद्दा आपण अमेरिकेसह मोठ्या देशांसमोर मांडणार आहोत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने दखल घेतल्यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय झालाय, असं इम्रान खानने सांगितलं. दरम्यान, यूएनएससी बैठकीत चीनच्या मदतीने पाकिस्तानने मुद्दा उपस्थित केला होता. पण या चर्चेसाठी बंद दाराआड अनौपचारिक बैठक झाली होती, हे इम्रान खानने पाकिस्तानच्या जनतेला सांगितलं नाही.

जगातील शक्तीशाली आणि मुस्लीम देशही आज त्यांच्या मजबुरीमुळे भारतासोबत आहेत. पण योग्य वेळी सर्व जण आपली साथ देतील. तुम्ही नाराज होऊ नका, आपण संपूर्ण जगात काश्मीरचे राजदूत बनू. मी 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उचलणार आहे, असं इम्रान खानने पाकिस्तानच्या जनतेला सांगितलं.

दरम्यान, इम्रान खानने एका नव्या कार्यक्रमाचीही घोषणा केली. काश्मीरच्या जनतेला विश्वासात घेण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयातील लोक शुक्रवारी दुपारी 12 ते 12.30 या वेळेत बाहेर पडतील, असं इम्रान खानने जाहीर केलं.

संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा मुद्दा घेऊन गेलेल्या चीनचा आणि पाकिस्तानलाही तोंडावर पडावं लागलं. यावर इम्रान खानने जनतेसमोर सांगितलं की, कमकुवत देशांच्या बाजूने उभं राहणं यूएनची जबाबदारी आहे, पण त्यांच्याकडून कायम शक्तीशाली देशांची साथ दिली जाते. सव्वा अब्ज लोकसंख्या आता तुमच्याकडे पाहत आहे. दोन्ही देशांकडे अण्विक शस्त्र आहेत. युद्ध झाल्यास दोन्ही देशांसह संपूर्ण जग उद्ध्वस्त होईल. आम्ही काश्मीरसाठी कोणत्याही पातळीवर जाऊ, अशी पोकळ धमकी इम्रान खानने दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *