इम्रान खान सरकारची गच्छंती अटळ; अविश्वास ठरावापूर्वीच ‘एमक्यूएमने’ सरकारचा पाठिंबा काढला

इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. इम्रान खान सरकारवरील संकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत. इम्रान खान यांची पार्टी असलेल्या तहरीक-ए-इंसाफ 'पीटीआय'चा मित्र पक्ष मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तानने सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे.

इम्रान खान सरकारची गच्छंती अटळ; अविश्वास ठरावापूर्वीच एमक्यूएमने सरकारचा पाठिंबा काढला
इम्रान खान
Image Credit source: tv9
| Updated on: Mar 30, 2022 | 2:45 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारला महागाई रोखण्यात अपयश आल्याने सत्ताधारी आघाडीतील पक्षांनी बंड पुकारलं आहे. इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव (no-trust motion) मांडण्यात आला आहे. या ठरावावर उद्या 31 मार्च रोजी चर्चा होणार आहे. मात्र या चर्चेपूर्वीच इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. इम्रान खान सरकारवरील संकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत. इम्रान खान यांची पार्टी असलेल्या तहरीक-ए-इंसाफ ‘पीटीआय’चा मित्र पक्ष मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तानने सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. एमक्यूएमने विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स सोबत जाण्याचा निर्णय घेताला आहे. एमक्यूएमने पीटीआयचा पाठिंबा काढल्याने इम्रान खान सरकारची गच्छंती अटळ मानली जात आहे.

विरोधकांकडे अधिक सदस्य संख्या

एमक्यूएमने पीटीआयचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर पीपीपीचे अध्यक्ष बिलावत भुट्टो यांनी एक ट्विट केले आहे. पीपीपी आणि एमक्यूएममध्ये एक करार झाल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच उद्या या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद देखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी ‘ अभिनंदन पाकिस्तान’ असे देखील म्हटले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीतील सदस्य संख्या 342 आहे. अविश्वास प्रस्ताव जिंकण्यासाठी विरोधकांना 172 मतांची गरज आहे. एमक्यूएमने सरकारचा पाठिंबा काढण्यामुळे आता विरोकांची सदस्य संख्या 177 झाली आहे. तर इम्रान यांना आता 164 सदस्यांचा पाठिंबा आहे, याचाच अर्थ इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागण्याची दाट शक्यता आहे.

1 ते 4 एप्रिल दरम्यान चर्चा

आता या अविश्वास प्रस्तावावर उद्यापासून ते चार एप्रिल दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. नॅशनल असेंबलीच्या नियमानुसार अविश्वास प्रस्ताव सादर केल्या जाण्याच्या तीन दिवस आधी आणि सात दिवसानंतर मतदान घेतलं जात नाही.

बिलावत भुट्टो यांचे ट्विट

 

संबंधित बातम्या

पत्रामध्ये नेमकं दडलंय तरी काय? इम्रान खान यांनी उल्लेख केलेलं ‘ते’ पत्र आता सरन्यायाधीशांकडे सादर केले जाणार, अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयाचा अक्षेप

Imran Khan: अखेर इमरान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल, 31 मार्च रोजी चर्चा; पाकिस्तानात इम’रान’ राहणार की जाणार?

पाकिस्तानात इमरान खान सरकारच्या अडचणी वाढल्या, अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता