AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रामध्ये नेमकं दडलंय तरी काय? इम्रान खान यांनी उल्लेख केलेलं ‘ते’ पत्र आता सरन्यायाधीशांकडे सादर केले जाणार, अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयाचा अक्षेप

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी सोमवारी इस्लामाबादमधील रॅलीत ज्या 'गूढ पत्र'चा उल्लेख केला होता, ते पत्र आता देशाच्या सरन्यायाधीशांना (Pakistan Chief Justice) दाखवले जाणार आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखाने ही माहिती दिली आहे.

पत्रामध्ये नेमकं दडलंय तरी काय? इम्रान खान यांनी उल्लेख केलेलं 'ते' पत्र आता सरन्यायाधीशांकडे सादर केले जाणार, अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयाचा अक्षेप
इम्रान खानImage Credit source: TV9
| Updated on: Mar 30, 2022 | 1:52 PM
Share

इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी सोमवारी इस्लामाबादमधील रॅलीत ज्या ‘गूढ पत्र’चा उल्लेख केला होता, ते पत्र आता देशाच्या सरन्यायाधीशांना (Pakistan Chief Justice) दाखवले जाणार आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुखाने ही माहिती दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या पक्षांच्या प्रवक्त्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी या पत्राबाबत माहिती दिली होती. या बैठकीत पक्षाच्या सध्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत बोलताना इम्रान खान यांनी त्यांचा पक्ष तहरीक-ए-इंसाफचे सरकार पाडण्यामागे परदेशी शक्तींचा हात असल्याचा देखील दावा केला होता. या पत्राच्या रुपाने आपल्याकडे त्यासंदर्भात पुरावा असल्याचे देखील इम्रान यांनी म्हटले होते. आता हे पत्र पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना दाखवण्यात येणार आहे. या पत्रामध्ये नेमकं काय दडलं आहे? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयाकडून अक्षेप

दरम्यान हे पत्र सरन्यायाधीशांना दाखवण्याच्या मुद्द्यावर अॅटर्नी जनरल कार्यालयाने (एजीपी) ने अक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी या पत्राबाब बोलताना म्हटले आहे की, हा विषय न्याय किंवा न्यायव्यवस्थेशी संबंधित नाही. त्यामुळे हे पत्र सरन्यायाधीशांना दाखवण्याची गरज नसल्याचे खान यांनी म्हटले आहे. दरम्यान अॅटर्नी जनरल कार्यालयाच्या अक्षेपानंतर हे पत्र सरन्यायाधीशांपर्यंत पोहोचणार का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

रॅलीत इम्रान यांनी नेमंक काय म्हटले होते?

27 मार्च रोजी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत इम्रान खान यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. पाकिस्तानी सरकार अस्थिर करण्यामागे विदेशी शक्तींचा हात असल्याचे इम्रान यांनी म्हटले होतो. विदेशी शक्ती आमच्या पक्षाचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते पाकिस्तानमधील लोकांचा उपयोग करत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. एवढेच नाही तर मला लेखी धमकी देण्यात आल्याचा दावा देखील त्यांनी या रॅलीत केला होता. मात्र काहीही झाले तरी मी राष्ट्रहिताशी तडजोड करण्यार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War : कोणता बॉम्ब कधी जीवन संपवेल अशी मारियुपोल शहरात परिस्थिती, 5 हजार लोकांचा हल्ल्यात मृत्यू

एक-दोन नाही 50-60 गाड्या एकमेकांना आदळल्या, तिघांचा मृत्यू; पाहा, पेनसिल्व्हेनियामधल्या वादळाचा Shocking Video

Baba Vanga Prediction : गोष्ट ऐकली तरी अंगावर काटा येईल, Putin बनणार “जगाचे स्वामी”, बाबा वेंगाची भविष्यवाणी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.