एक-दोन नाही 50-60 गाड्या एकमेकांना आदळल्या, तिघांचा मृत्यू; पाहा, पेनसिल्व्हेनियामधल्या वादळाचा Shocking Video

एक-दोन नाही 50-60 गाड्या एकमेकांना आदळल्या, तिघांचा मृत्यू; पाहा, पेनसिल्व्हेनियामधल्या वादळाचा Shocking Video
पेनसिल्व्हेनिया महामार्गावर बर्फाच्या वादळामुळे एकमेकांवर आदळल्या गाड्या
Image Credit source: Globalonlinemony

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया महामार्गावर (Pennsylvania Highway) बर्फाचे वादळ (Snow Squall) आले. या वादळामुळे महामार्गावर एकामागून एक 50 ते 60 वाहने आदळल्याची घटना घडली आहे. अपघातात आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रदीप गरड

|

Mar 29, 2022 | 1:19 PM

वॉशिंग्टन : सोमवारी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया महामार्गावर (Pennsylvania Highway) बर्फाचे वादळ (Snow Squall) आले. या वादळामुळे महामार्गावर एकामागून एक 50 ते 60 वाहने आदळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पेनसिल्व्हेनियाच्या शुयलकिल काउंटीमध्ये घडला. अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या भीषण अपघाताचा एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला असून त्यात एकामागून एक वाहने आदळताना दिसत आहेत. बर्फवृष्टीमुळे वाहनचालकांचे नियंत्रण कसे सुटत आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारची धडक बसल्यानंतर लोक गाड्यांमधून बाहेर पडत आहेत. वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झालेला पाहायला मिळत आहे. बर्फवृष्टीमुळे दिसतही नव्हते.

अनेक मैल वाहतूक खोळंबली

पेनसिल्व्हेनिया परिवहन विभागाने अपघाताविषयी सविस्तर माहिती पेनसिल्व्हेनिया राज्य पोलिसांकडे पाठवली. सोमवारी दुपारी ट्विटरवर लिहिले होते, की 50 ते 60 वाहने पाइलअपमध्ये गुंतलेली. यात मृत्यूच्या माहितीसह तत्काळ तपशील दिलेला नाही. या ढिगाऱ्याने महामार्गावरील अनेक मैल वाहतूक खोळंबली, ज्यामुळे आपत्कालीन कार्य करण्यातही अडचणी येत होत्या. त्यांना ढिगाऱ्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले, की वाहनांची रांग सुमारे एक मैलपर्यंत वाढली. अतिरिक्त बर्फवृष्टीच्या धोक्यामुळे बचावकार्यात आणखी गुंतागुंत वाढली. ज्यामुळे अधिकाऱ्यांना अनेक तास महामार्ग बंद करावा लागला.

दृश्यमानता जवळपास शून्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील दृश्यमानता जवळपास शून्य होती, त्यामुळेच हा अपघात इतका भीषण होता. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुयलकिल कंट्रीमध्ये या महिन्यातील हा दुसरा मोठा अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा :

Video : जगातला सर्वात महागडा उंट, किंमत माहीत आहे का? सौदी अरेबियात नुकताच झालाय लिलाव; वाचा सविस्तर

थोड्याशा मौजमजेनं घेतला जीव! 430 फूट उंच पाळण्यावरून पडला, आई-वडिलांच्या समोर मुलाचा करुण अंत

Snakes rare moments : कॅमेऱ्यात कैद नागांची प्रणयक्रीडा; वडाळ्यातला दुर्मीळ Video viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें