लाहौर न्यायालयात इम्रान खान यांना झाली धक्काबुक्की; पाय मोडला…

| Updated on: May 05, 2023 | 12:45 AM

गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला पाकिस्तानातील गुजरांवाला येथे स्वातंत्र्य संचलनात इम्रान खान यांच्यावर गोळीबार झाला होता, त्यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला गोळी लागली होती. गोळी लागल्याने त्यांच्या उजव्या पायाचे हाडही मोडले होते.

लाहौर न्यायालयात इम्रान खान यांना झाली धक्काबुक्की;  पाय मोडला...
Follow us on

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाय पुन्हा एकदा फ्रॅक्चर झाला आहे. त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने सांगितले की, लाहोर उच्च न्यायालयात झालेल्या हाणामारीत इम्रान खान यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तर पीटीआयचे खासदार शिबली फराज यांनी सांगितले की, इम्रान खान मंगळवारी लाहोर उच्च न्यायालयात हजेरी लावत असताना झालेल्या वादामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे आता त्यांना डॉक्टरांनी 10 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी शाहबाज सरकारवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.

यावेळी ते म्हणाले की पूर्ण बरे झाल्यानंतर इम्रान खान पुन्हा एकदा न्यायालयीन कामकाजात सहभागी होतील कारण ते न्यायालयाचा आदर करत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

सिनेटर फराज यांनी डॉ. इफ्तिखार दुर्रानी यांनी ट्विटद्वारे ही या घटनेची माहिती त्यांनी दिली आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये इम्रान खानच्या पायाचा एक्स-रे काढलेला फोटो आहे.

तर त्याचवेळी पीटीआय सातत्याने इम्रान खान यांच्या सुरक्षेचा मुद्दा सरकारसमोर मांडला जात असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

न्यायालयात जात असतानाच इम्रान खान यांना जमावाकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे ते त्या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.

18 एप्रिल रोजी लाहोर उच्च न्यायालयाने एका प्रकरणात त्यांना 3 मे पर्यंत जामीन मंजूर करण्यात आला होता. इम्रानने जामिनाची मुदत वाढवून न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्याची विनंती केली होती.

त्यामुळे न्यायालयानेही इम्रानची विनंती मान्य केली होती पण त्याला 3 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला पाकिस्तानातील गुजरांवाला येथे स्वातंत्र्य संचलनात इम्रान खान यांच्यावर गोळीबार झाला होता, त्यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला गोळी लागली होती. गोळी लागल्याने त्यांच्या उजव्या पायाचे हाडही मोडले होते.