Myanmar Violence: म्यानमारमध्ये सैन्याच्या हिंसेला पीपल्स डिफेन्स फोर्सकडून प्रत्युत्तर, लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, 40 सैनिकांना मारलं!

| Updated on: Oct 07, 2021 | 3:50 PM

मंगळवारी मगवे परिसरातील गंगाव शहराजवळ हा हल्ला करण्यात आला. युवा डिफेन्स फोर्सने म्हणण्यानुसार, त्याच्या सदस्यांनी 50 वाहनांचा समावेश असलेल्या लष्करी ताफ्यावर हल्ला केला.

Myanmar Violence: म्यानमारमध्ये सैन्याच्या हिंसेला पीपल्स डिफेन्स फोर्सकडून प्रत्युत्तर, लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, 40 सैनिकांना मारलं!
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

म्यानमारमध्ये लष्करावर झालेल्या भीषण हल्ल्यात 40 जवानांना मारण्यात आलं आहे तर 30 जण जखमी झाले आहेत. नागरी प्रतिकार शक्ती संघटनेच्या सदस्यांनी हा हल्ला केल्याची माहिती दिली आहे. मंगळवारी मगवे परिसरातील गंगाव शहराजवळ हा हल्ला करण्यात आला. युवा डिफेन्स फोर्सने म्हणण्यानुसार, त्याच्या सदस्यांनी 50 वाहनांचा समावेश असलेल्या लष्करी ताफ्यावर हल्ला केला. ( In Myanmar, an army convoy was attacked by the People’s Defense Force, killing 40 soldiers )

पीडीएफने म्यानमारचं वृत्तपत्र इरावाडीला सांगितले की, ” 14 लँडमाईनचा वापर करुन सैन्य ताफ्याला निशाणा बनवलं. हा सैन्याचा ताफा गंगव-पाले महामार्गावरून जात होता. या हल्ल्यात 40 जवान मृत्यूमुखी पडले आहेत आणि 30 जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. या हल्ल्यात एका सशस्त्र कारचेही नुकसान झालं आहे. इरावाडीने अद्याप मारलेल्या सैनिकांच्या संख्येची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.

सैन्य कमांडरकडे वायडीएफला संपण्याची जबाबदारी

बंडखोर संघटनेने लोकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी गंगव-काले आणि गंगव-हॅटीलिन महामार्गांपासून दूर राहावं, कारण ते लष्कर आणि पीपल्स डिफेन्स फोर्स यांच्यातील गोळीबाराचे बळी ठरू शकतात. एवढेच नाही तर, मंगळवारी संध्याकाळी सैन्याच्या 18 वाहनांचा समावेश असलेल्या आणखी एका ताफ्यालाही लक्ष्य करण्यात आलं आहे. हा ताफा काले शहरापासून सगईंग भागात जात होता. या हल्ल्यांमुळे लष्कराने आता पीडीएफला नष्ट करण्याची जबाबदारी कुख्यात लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल थान हलांग यांना दिली आहे.

गेल्या तीन महिन्यांत या भागात 1100 सैनिक बंडखोरांच्या कारवाईत मारले गेले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून म्यानमारच्या लष्कराने मगवे आणि चीनच्या सीमावर्ती भागात आणखी 3000 सैनिक पाठवले आहेत. म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीला झालेल्या लष्करी विद्रोहानंतर, तिथली परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. सैन्याकडून सामान्य नागरिकांवर हिंसेचा वापर केला जात आहे. अनेक नागरिक पळून भारतात येत आहे, मणिपूरमध्ये असे नागरिक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. लष्कराने पीडीएफ क्षेत्रात इंटरनेट आणि फोन सेवा बंद केली आहे.

हेही वाचा:

South China Sea मध्ये चिनी जहाजांची घुसखोरी, मलेशिया भडकला, मलेशियन राजदुताला चीनमधून परत बोलावलं

संतापजनक! कॅथॉलिक पादरींकडून साडे तीन लाख लेकरांचं लैंगिक शोषण, देवाच्या दरबारात काळं कृत्य