Nimisha Priya : येमेनमध्ये फाशीची शिक्षा टाळण्यासाठी निमिषाला किती लाख द्यावे लागतील? भारतीय नर्सला वाचवण्याची शेवटची संधी

Nimisha Priya : यमनमध्ये शरिया कायद्यानुसार अब्दो कुटुंब ब्लड मनी स्वीकारण्यास तयार झालं, तर निमिषाची फाशी रद्द होईल. अब्दो महदी कुटुंब ब्लड मनी स्वीकारायला तयार होईल, अशी निमिषाच्या आईला अपेक्षा आहे. यासाठी चर्चा सुरु आहे.

Nimisha Priya :  येमेनमध्ये फाशीची शिक्षा टाळण्यासाठी निमिषाला किती लाख द्यावे लागतील? भारतीय नर्सला वाचवण्याची शेवटची संधी
Nimisha Priya
| Updated on: Jul 10, 2025 | 12:57 PM

यमनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीपासून वाचवण्यासाठी शेवटचा डाव खेळण्यात आला आहे. निमिषाच्या कुटुंबाने अब्दो महदी यांच्या कुटुंबाला 1 मिलियन डॉलर म्हणजे (जवळपास 85 लाख रुपये) देण्याचा प्रस्ताव दिला आहे. निमिषाला अब्दोच्या हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यमनमध्ये शरिया कायद्यानुसार अब्दो कुटुंब ब्लड मनी स्वीकारण्यास तयार झालं, तर निमिषाची फाशी रद्द होईल. अब्दो महदी कुटुंब ब्लड मनी स्वीकारायला तयार होईल, अशी निमिषाच्या आईला अपेक्षा आहे. यासाठी चर्चा सुरु आहे.

यमनच्या शरिया न्यायालयाने महदी मर्डर प्रकरणात निमिषा प्रियाला दोषी ठरवलय. 16 जुलै रोजी तिला फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली आहे. कोर्टानुसार, निमिषा तिचा पार्टनर महदीला मारण्याच्या गुन्ह्यात थेट सहभागी होती. म्हणून तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.

निमिषाला वाचवण्यासाठी यमनमध्ये एक ग्रुप

म्हणजे 16 जुलैपूर्वी ब्लड मनीचा प्रस्ताव अब्दो महदीच्या कुटुंबाने स्वीकारला नाही, तर निमिषा प्रियाला फाशी होईल. निमिषाला वाचवण्यासाठी तिची आई केरळवरुन तिथे गेलीय. मुलीला वाचवण्यासाठी त्या सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. निमिषाला वाचवण्यासाठी यमनमध्ये एक ग्रुपही तयार करण्यात आलाय.

निमिषावर आरोप काय?

2008 साली निमिषा नर्सच्या नोकरीसाठी केरळहून यमनला गेली होती. तिला 2017 साली तिथे अटक झाली. त्याचवर्षी महदीची हत्या झालेली. त्याचा मृतदेह सापडलेला. पोलिसांनुसार, निमिषाने ड्रग्स देऊन महदीची हत्या केली. त्यानंतर तो मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला.

निमिषाने का हत्या केली?

निमिषाच्या वकीलानुसार, महदी तिचा बिजनेस पार्टनर होता. एकदिवस अचानक त्याने तिच्याशी शारीरिक दुर्व्यवहार केला. तिचा पासपोर्ट हिसकावून घेतला व बंदूक रोखून धमकी दिली. पासपोर्ट परत घेण्यासाठी निमिषाने त्याला बेशुद्धीच इंजेक्शन दिलं. पण त्याचा ओव्हरडोस झाला.

आईला संपूर्ण घर विकावं लागलं

निमिषाच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं की, केस लढण्यासाठी तिला तिचं संपूर्ण घर विकावं लागलं. आता निमिषाला वाचवण्यासाठी क्राऊड फंडिंग सुरु आहे. ब्लड मनीसाठी महदी कुटुंब तयार झालं, तर ते पैसे त्यांना देण्यात येतील. आता सर्वकाही महदी कुटुंबावर अवलंबून आहे.