काय वेळ आली? दिवस फिरले, हुंड्यामध्ये मागतिला LPG सिलेंडर
पूर्वी हुंड्यामध्ये पैसे, दागिने आणि गाड्या मागितल्या जायच्या पण आता चक्क हुंड्यामध्ये LPG सिलेंडरची मागणी करण्यात येत आहे... नक्की काय आहे प्रकरण घ्या जाणून...

इराण–अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. याच कारणामुळे अनेक कौटुंबिक आणि व्यवसायीक कार्यक्रमांवर संटक आलं आहे. याच दरम्यान, छत्तीसगडमधील अंबिकापूर येथील व्हायरल होत असलेल्या एका फोटोने सोशल मीडियावर वाद निर्माण केला आहे. एका स्थानिक हॉटेलबाहेर लावलेल्या फलकावरून सिलेंडर टंचाईची तीव्रता अधोरेखित होते आणि त्यातून व्यंग्यात्मक पण कटू सत्य समोर आलं आहे.
अंबिकापूरमधील एका हॉटेलच्या बाहेर असलेल्या फलकावर लिहिले आहे की “वधूचा हुंडा: तुमच्या वतीने व्यावसायिक गॅस… अशी वेळ आता व्यवसायिकांवर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉटेल व्यवस्थापनाने ही सूचना पोस्ट केली कारण त्यांना लग्नासाठी आधीच बुकिंग मिळाले आहे, परंतु त्यांच्याकडे स्वयंपाकासाठी गॅस नाही.
हॉटेलचे मॅनेजर पूर्णेंद्र मजूमदार यांच्या सांगितल्यानुसार, आम्ही सतत हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑयल आणि इतर एजन्सीच्या देखील संपर्कात आहोत. अनेक ठिकाणी फेऱ्या देखील मारल्या आहेत. पण सकारात्मक प्रतिसाद कुठेच मिळत नाही. नवीन साठा पुरवण्यास एजन्सी असमर्थता व्यक्त करत आहेत.
पूर्णेंद्र मजूमदार यांच्याकडे दोन दिवस पूरेल असा गॅसचा साठा शिल्लक आहे. पण परिस्थिती लवकरात लवकर सुधारली नाही तर, हॉटेल बंद करण्याची वेळ येईल. व्यावसायिक सिलिंडरशिवाय, लग्नासारख्या मोठ्या कार्यक्रमांसाठी अन्न तयार करणे अशक्य आहे. ही परिस्थिती केवळ मोठ्या हॉटेल्ससाठीच नाही तर स्ट्रीट फूड स्टॉल्स आणि लहान केटरर्ससाठी देखील उपजीविकेचे संकट निर्माण करते.
तर महाराष्ट्रात देखील परिस्थिती कठीण आहे. लग्न ठरल्यानंतर अनेकांना निमंत्रण देण्यात आलं, पण सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे पाहुण्यांचा पाहुंचार कसा करायचा अशा मोठा प्रश्न कुटुंबियांसोबर आहे. तर घरगुती सिलेंडर बुक होण्यास देखील अनेक अडचणी येत आहेत.
सिलेंडर ऑनलाईन बुक होत नसल्यामुळे अनेकांनी गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. पण असं असताना देखील अनेकांनी रिकाम्या हाताने पुन्हा घरी यावं लागत आहे. तर सरकारने देखील स्पष्ट केलं आहे की, LPG गॅसचा पुरवठा सामान्य आणि कोणत्याच प्रकारची कमतरता भासणार नाही. गॅस कंपन्यांच्या नियमांनुसार, ग्राहक मागील सिलेंडरच्या डिलिव्हरीच्या 25 दिवसांच्या आत नवीन सिलेंडर बुक करू शकत नाहीत. हा नियम अनावश्यक आणि पॅनिक बुकिंग टाळण्यासाठी बनवण्यात आला आहे.
