AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaye Khanna : त्याच्यामुळे मला मोठा ट्रॉमा.. अक्षय खन्नाबाबत हे काय बोलून गेली फराह खान ?

"धुरंधर" या चित्रपटातील कामाद्वारे लोकांचं मन जिंकणाऱ्या अक्षय खन्नाबद्दल कोरिओग्राफर - दिग्दर्शिका फराह खानने एक धक्कादायक विधान केले आहे. अक्षय चांगला माणूस नव्हता , त्याच्यासोबत काम करायलाही कचरायचे असं फराहने नुकतंच एका मुलाखीत सांगितलं.

Akshaye Khanna :  त्याच्यामुळे मला मोठा ट्रॉमा.. अक्षय खन्नाबाबत हे काय बोलून गेली फराह खान ?
फराह खान- अक्षय खन्ना
| Updated on: Mar 14, 2026 | 1:58 PM
Share

बॉलिवूडमधले अनेक अभिनेते हे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात, पण काही स्टार असेही आहेत की जे खूप लोकप्रिय असूनही स्पॉटलाईटमध्ये किंवा सार्वजनिक जीवनातही फार दिसत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) . तो बाहेर फार दिसत नाही, पण त्याच्याबद्दल अनेक गोष्टी कानावर येत असतात. मात्र नुकताच तो ‘धुरंधर’ मध्ये दिसला, त्याच्या रेहमान डकैतने लोकांना वेडं केल. त्याच्या कामची खूप प्रशंसाही झाली. मात्र आता याच अक्षय खन्नाबादल सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अक्षय बद्दल ती जे बोलून गेली त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अक्षयसोबत काम करायचं नव्हतं ?

फराह खान ही नुकतीच, युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये आली होती. तेव्हा तिला “तीस मार खान” या कल्ट चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. फराहने खुलासा केला की ती आतिश कपूरसाठी अक्षय खन्नाला कास्ट करण्यापूर्वी शर्मन जोशीला भेटली होती. पण त्याने हे काम करण्यास नकार दिला आणि ही भूमिका अक्षय खन्नाकडे गेली. या भूमिकेसाठी अक्षय खन्ना हाँ शेवटचा ऑप्शन होता, असं तिने सांगितलं.

तो चांगला वागत नसे..

अक्षयसबोतच्या कोलॅबवरही ती बोलली. “90च्या दशकात मी अक्षयसोबत दोन-तीन चित्रपट केले आणि त्यानंतर मला खूप धक्का बसला. कारण तो तेव्हा पूर्णपणे वेगळा माणूस होता. हो, तो अंतर्मुख होता, पण सेटवर तो फारसा चांगला नव्हता. त्यामुळे जेव्हा मला समजायचं कीन कळायचे की अक्षय खन्ना एखाद्या चित्रपटात आहे, मी लगेच सांगायचे की माझ्याकडे (कामासाठी) तारखा नाहीत. तेव्हा त्यानेच सांगितलं होती की, त्या काळात त्याचे केस गळत होते, तो नेहमी चिडायचा, वस्तू फेकायचा आणि म्हणायचा, “हा कसला संवाद आहे?” तेव्हा तो अशा प्रकारचा माणूस होता”. असं फराहने सांगितलं.

अक्षयशी कसं बदललं नातं ?

फराहचा मावसभाऊ याने दिल चाहता है चं दिग्दर्शन केलं, तेव्हा फराह आणि अक्षयची सेटवर भेट झाली. मात्र तेव्हा तो खूप बदलला, असं फराहने सांगितलं. “तोपर्यंत तो पूर्णपणे बदलला होता. केस जात होते, पण तो त्याबद्दल ओके होता.’दिल चाहता है’ मध्ये तो खूप शांत आणि रिलॅक्स्ड होता. त्याआधी, जर एखाद्या दृश्यात पाणी किंवा पाऊस असेल तर तो नेहमीच टोपी घालायचा. म्हणजे ‘ताल’ मधील पावसाचे गाणे, त्यात त्याने डोक्यावर टोपी घातली होती ना. पण ‘दिल चाहता है’ नंतर काहीतरी बदललं. आणि तो एक उत्तम डान्सर आहे. जर तुम्ही ‘कोई कहे कहता रहे’ हे गाणे पाहिले तर तुम्हाला दिसलं असेल की, तो तर आमिर आणि सैफपेक्षाही चांगला नाचलाय” अशी आठवण फराहने सांगितली.

“आजच्या काळात आमचं नातं खूप चांगलं आहे. तो अशा प्रकारचा माणूस नाही ज्याच्यासोबत तुम्ही फक्त टाईमपास कराल. पण जेव्हा मी त्याचा धुरंधर चित्रपट पाहिला तेव्हा मी त्याला फोन केला आणि अलिबागमधील त्याच्या घरीही गेले. . मला त्याच्याबद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे ना, तो कधीच दिखावा, शो-ऑफ करत नाही; तो त्याच्या कामावर पूर्णपणे फोकस करतो, सगळं लक्ष कामावर केंद्रित असतं, त्याला अभिनय आवडतो” अशा शब्दांत फराहने त्याचं कौतुक केलं.

Follow Us
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.