महाराष्ट्रापेक्षा छोटा देश भारतासाठी ठरला देवदूत, मोठ्या संकटातून बाहेर काढलं; अमेरिकेला दणका!

Crude Oil : जगात तणाव वाढल्यामुळे तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा संकटाच्या काळात महाराष्ट्रापेक्षा एक छोटा देश भारताच्या कामी आला आहे. या देशाकडून भारताने कच्चे तेल खरेदी केले आहे.

महाराष्ट्रापेक्षा छोटा देश भारतासाठी ठरला देवदूत, मोठ्या संकटातून बाहेर काढलं; अमेरिकेला दणका!
crude oil deal
Image Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड | Updated on: Jan 14, 2026 | 6:03 PM

गेल्या काही काळापासून भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे. त्यामुळे भारत आता इतर पर्यायांचा विचार करत आहे. तसेच भारत एकाच देशावरील अवलंबित्वही कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारताने जगातील 50 पेक्षा जास्त देशांसोबत तेलाचे करार केलेले आहेत. तसेच जगात तणाव वाढल्यामुळे तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा संकटाच्या काळात महाराष्ट्रापेक्षा एक छोटा देश भारताच्या कामी आला आहे. या देशाकडून भारताने कच्चे तेल खरेदी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या देशाकडून तेल खरेदी

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारताने इक्वेडोर या देशाकडून तेल खरेदी केले आहे. हा देश महाराष्ट्रापेक्षा लहान आहे. एका भारतीय सरकारी कंपनीने या लहान देशाकडून 20 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. तसेच आता आगामी काळात आणखी तेल खरेदी करण्याची शक्यता आहे. या व्यापारामुळे रशियन तेलाचा पुरवठा कमी झाल्याने आता निर्माण झालेली तूट भरून निघण्यास मदत झाली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) रशियन तेलाच्या कमतरतेची भरपाई करण्यासाठी अनेक देशांसोबत करार करत आहे. रशियन उत्पादक आणि शिपर्सवर अमेरिका आणि युरोपियन यूनियन निर्बंध लादत असल्यामुळे भारतातील आयात घटली आहे. त्यामुळे आता भारत नवीन तेल विक्रेत्या देशांच्या शोधात आहे. त्यामुळे आता भारत इक्वेडोरकडून तेल खरेदी करताना दिसत आहे.

किती तेल खरेदी केले?

सूत्रांच्या माहितीनुसार, IOC ने 20 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. याची किंमत किती आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कारण IOC ने अद्याप या विषयावर कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. भारत आखाती देशांकडून सर्वात जास्त तेल खरेदी करतो, मात्र आता भारताने दक्षिण अमेरिकन देशांकडेही मोर्चा वळवला आहे. यात मेक्सिको, ब्राझील आणि कोलंबिया या देशांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रापेक्षा लहान देश

इक्वेडोर हा महाराष्ट्रापेक्षा लहान आहे. या दक्षिण अमेरिका खंडातील देशाचे क्षेत्रफळ 283,561 चौरस किलोमीटर आहे, तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 308,000 चौरस किलोमीटर आहे. सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 14 कोटी दशलक्ष आहे, तर इक्वेडोरची लोकसंख्या सुमारे 1.8 कोटी आहे. इक्वेडोरचा एकूण जीडीपी 130.5 अब्ज डॉलर्स आहे. तर महाराष्ट्राचा जीडीपी 580 अब्ज डॉलर्स असण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ जीडीपीच्या बाबतीत, महाराष्ट्र इक्वेडोरपेक्षा 4.5 पट मोठा आहे.