
मागील काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळाले. यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यात आले. आता भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानसोबतच थेट चीनलाही मोठा इशारा दिलाय. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनमध्ये जवळीकता वाढल्याचे बघायला मिळाले. मात्र, चीनच्या मागून कुरघोडी सुरू असल्याने आता भारताकडून इशारा देण्यात आला आहे. अनिल चौहान यांनी देशाच्या सुरक्षेबद्दल भाष्य करताना इशारा दिलाय.
भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी म्हटले की, भारत हा नेहमीच शांततेचा समर्थक राहिला आहे. मात्र, शक्तीशिवाय शांतता हे केवळ आता स्वप्नच राहिले आहे. सुदर्शन चक्राबद्दलही त्यांनी मोठे भाष्य केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी फक्त शांततेची इच्छा पुरेशी नाही. आपल्याला त्यासोबतच धोरणात्मक शक्ती आणि तयारी देखील आवश्यक आहे. जनरल अनिल चौहान यांनी म्हटले की, भारत नेहमीच शांततेच्या बाजूने उभा राहिला आहे.
परंतु ताकदशिवाय शांतता हा केवळ एक भ्रम आहे. भारत एक शांतताप्रिय राष्ट्र आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीत आपल्याला शांततावादी मानले जाऊ नये. शांतता राखण्यासाठी शक्ती आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, एक म्हण अशी आहे की, जर तुम्हाला शांती हवी असेल तर युद्धासाठी तयार रहा. ऑपरेशन सिंदूरबाबतही त्यांनी अत्यंत मोठे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या भूमिवरून पाकिस्तानने भारताला मोठी धमकी दिली. यासोबतच चीन देखील भारतावर दबाव टाकण्याचे काम करत आहे.
आता भारताकडून चीन आणि पाकिस्तानला थेट उत्तर देण्यात आले आहे. अमेरिकेसोबत हात मिळवणी करून भारताविरोधात पाऊचे उचलताना अमेरिका दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक चिघळल्याचे बघायला मिळाले. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला आणि भारतीय पर्यटकांचा जीव घेतला. धक्कादायक म्हणजे चक्क धर्म विचारून पर्यटकांना टार्गेट करण्यात आले.