AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प टॅरिफनंतर दुसरा मोठा धक्का देण्याच्या तयारीत, भारतीयांच्या जाणार धडाधड नोकऱ्या, थेट…

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून हुकूमशाही करताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लागून मोठा धक्का दिला आहे. आता हेच नाही तर अजून एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. यामुळे आता जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळतंय.

डोनाल्ड ट्रम्प टॅरिफनंतर दुसरा मोठा धक्का देण्याच्या तयारीत, भारतीयांच्या जाणार धडाधड नोकऱ्या, थेट...
Donald Trump
| Updated on: Aug 26, 2025 | 11:49 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प हे एका मागून एक करून जगाला मोठे धक्के देताना दिसत आहेत. आता तर थेट H1B व्हिसावर बंदी घालण्याची शक्यता आहे. हा अत्यंत मोठा धक्काच म्हणावा लागेल. जर हा निर्णय झाला तर अनेक भारतीयांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. एका अधिकाऱ्याला H1B व्हिसा देण्यासाठी कर्मचाऱ्याने लाच दिली. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. ज्यामुळे अमेरिकेत H1B  वरून वाद आणखी तीव्र झाला आहे. 1990 मध्ये सुरू झालेला H1B व्हिसा अमेरिकन कंपन्यांना विशेष व्यवसायांमध्ये परदेशी कामगारांना कामावर ठेवण्याची परवानगी देतो. हा व्हिसा तीन वर्षांसाठी दिला जातो आणि पुढे तो सहा वर्षांसाठी वाढवता देखील येतो.

विशेष म्हणजे दरवर्षी अमेरिकी सरकार 65,000 H1B व्हिसा जारी करते. यामध्ये अमेरिकन विद्यापीठांमध्ये पीएचडी आणि इतर शिक्षण याकरिता 20.000 व्हिसा दिली जातात तर जे लोक आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्या करतात त्यांना देखील मोठ्या प्रमाणात H1B व्हिसा मिळतो. H1B वरून सध्या अमेरिकेत गोंधळाचे वातावरण बघायला मिळतंय. जेडी व्हान्स यांनी या व्हिसाबद्दल आता मोठे विधान केलंय.

जेडी व्हान्स यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, मोठं मोठ्या टेक कंपन्या अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढून टाकताना आणि H1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना कामावर ठेवतात. हा अमेरिकन कर्मचाऱ्यांवर होणारा मोठा अन्याय आहे. H1B व्हिसाबाबत आता टॅरिफच्या निर्णयानंतर ट्रम्प सरकार काही मोठा निर्णय घेऊ शकतो. ट्रम्प यांनी अगोदरच म्हटले आहे की, अमेरिका सर्वात पहिले. यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची धडधड वाढलीये. ट्रम्प हे याबाबत निर्णय लवकरच घेणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प सरकार H1B लॉटरी बंद करण्याचा सोबतच पगारावर आधारित प्राधान्य प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे. याचा अर्थ जास्त पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळेल, असे आहे. भारतातील इंजिनिअर, डॉक्टर, आणि संशोधक हे अमेरिकेत याच व्हिसावर जातात. जर हा व्हिसा बंद केला किंवा याच्या नियमात बदल झाला तर हा अमेरिकेचा दुसरा एक अत्यंत मोठा धक्का भारतासाठी म्हणावा लागेल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.