AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Russia : भारताचा जवळचा मित्र रशिया आर्थिक संकटात, आधी 4 अब्ज डॉलरचं सोनं विकलं आणि आता..वाईट दिवस म्हणतात ते हेच

India-Russia : रशियाची सध्या आर्थिक हालत खराब आहे. रशियाने आधीच मोठ्या प्रमाणात सोनं विकलं आहे आणि आता ते अजून एक मौल्यवान गोष्ट विकणार आहेत. भारत आणि रशियाचे खूप चांगले संबंध आहेत.

India-Russia : भारताचा जवळचा मित्र रशिया आर्थिक संकटात, आधी 4 अब्ज डॉलरचं सोनं विकलं आणि आता..वाईट दिवस म्हणतात ते हेच
Putin-Modi
| Updated on: Jul 27, 2026 | 7:23 PM
Share

कच्चा तेलाला काळं सोनं म्हटलं जातं. ज्या देशाकडे कच्चं तेल, गॅस मुबलक प्रमाणात आहेत ते देश श्रीमंत आहेत. भारताचा जवळचा मित्र रशियाचा सुद्धा अशाच देशांमध्ये समावेश होतो. रशियाकडे तेल, गॅस मुबलक प्रमाणात आहेत. पण सध्या रशियाचे खराब दिवस सुरु आहेत. युक्रेन युद्धामुळे रशियाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. रशियाला त्यांच्याकडे असलेलं सोनं विकावं लागलं आहे. आता मॉस्कोने हिऱ्यांच्या लिलावाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रशियन सरकारने नोटिफिकेशन जारी केलं आहे. रशियाच्या वित्त विभागानुसार येत्या 9 सप्टेंबरला मॉस्को 2.16 ग्रॅम हिऱ्यांचा लिलाव करणार आहे. हे हिरे खजिन्यात ठेवण्यात आले होते. आता ते विक्रीसाठी बाहेर काढले जाणार आहेत. सरकारनुसार, हे हिरे रशियाचे नागरिक विकत घेऊ शकतात. हिरे लिलावात सहभागी होण्यासाठी 2500 डॉलरचं टोकन जमा करणं अनिवार्य आहे. त्यासाठी 20 ऑगस्टपर्यंतची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

रशियाच्या अर्थ मंत्रालयानुसार हिऱ्यांच्या यशस्वी लिलावानंतर एक करारपत्र तयार केलं जाईल. या पत्राच्या हिशोबाने हिऱ्याचा मालकी हक्क मिळू शकेल. युक्रेनी मीडियानुसार, रशियाने त्यांच्या सरकारी खजिन्यामधून मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री केली आहे. यूनायटेड न्यूज 24 नुसार, रशियाच्या अर्थ मंत्रालयाने मागच्या 6 महिन्यात 445 टन सोनं विकलं आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने मार्च 2026 मध्ये रशियाने एका वर्षात 4 अब्ज डॉलरचं सोनं विकल्याचा दावा केला होता. रशियाच्या सरकारने याचं खंडन केलेलं नाही. आता रशियाची हिरे विक्रीची बातमी समोर आली आहे. रशियाने याआधी 2.16 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे हिरे विकले होते. पण आता पहिल्यांदा, 2.16 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे हिरे लिलावासाठी मांडले जाणार आहेत.

तेल आणि गॅस मधून मिळणाऱ्या महसूलात किती घट?

2022 पासून रशिया युक्रेन विरोधात युद्ध लढत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खराब आहे. वेगवेगळ्या प्रतिबंधामुळे रशियाला तेल आणि गॅसची विक्री करता येत नाहीय. 2025 मध्ये रशियाला तेल आणि गॅस मधून मिळणाऱ्या महसूलात 24 टक्के घट झाली आहे. अलीकडेच युक्रेनने रशियाच्या तेल आणि गॅस ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा रशियाची आर्थिक स्थिती खराब राहिलं. या संकटावर मात करण्यासाठी रशियाने आधी सोनं विकलं आणि हिऱ्यांच्या लिलावाचं नियोजन आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा