
पाकिस्तान आणि चीन वारंवार ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत निरनिराळे खोटे दावे करीत आहे. जगाची दिशाभूल करत आहे.पाकचा दावा आहे की भारताची राफेल त्यांनी पाडली आहेत. परंतू या दाव्यातील हवा निघाली आहे. अमेरिकन पायलट रेयान बोर्डनहाइमर यांनी एक मोठा दावा केला आहे. रेयान यांनी म्हटले आहे की भारताने कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) वापर करुन पाकिस्तानला या मोहिमेत चकवा दिला आहे. भारतीय वायू सेनेने राफेलमध्ये एक ३० किलोच्या डीव्हाईसचा वापर केला, ज्याने पाकस्तानच्या रडारला फसवले. चला तर पाहूयात नेमके काय झाले ?
अमेरिकन पायलट बोर्डनहायमर यांनी दावा केला आहे की भारतीय वायू सेनेने मे मध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकला चांगलेच मुर्ख बनवले. Defence Chronicle India नुसार अमेरिकन पायलट रेयान बोर्डनहायमर यांनी सांगितले की या ऑपरेशन दरम्यान भारतीय वायू सेनेने एक छोटेसे ३० किलोग्रॅमच उपकरण वापरले होते. यामुळे पाकिस्तानचा त्यांनी राफेल विमान पाडल्याचा समज झाला. वास्तविक ही एक चाल होती. या डिव्हाईसचे नाव x- गार्ड होते.
एक्स गार्ड एक राफेल एडवांस्ड डिफेन्स सिस्टम्सद्वारे तयार केलेले खास डिव्हाईस आहे. हे यंत्र आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)च्या मदतीने चालते. या ३० किलोग्रॅमच्या उपकरण एक मीटर लांबीच्या फायबर – ऑप्टीक केबलने विमानाच्या मागे लटकते. हे उपकरण ५०० वॅटचा एक ३६० डिग्री जॅमिंग सिग्नल तयार करते. जे शत्रूच्या रडार आणि मिसाईलला धोका देते. हे राफेल विमानासारखाच रडार सिग्नल आणि डॉप्लर इफेक्ट तयार करते. ज्यामुळे शत्रूला खऱ्या विमानाचा ठावठीकाणा समजत नाही.
येथे पोस्ट पाहा –
#PAF Fooled by Indian EW Tactics 🇮🇳
Ex-USAF F-15E pilot Ryan Bodenheimer calls #IAF’s spoofing in #OpSindoor “the best deception we’ve ever seen.”The secret? Rafale’s Israeli-made AI-powered X-Guard decoy—part of the SPECTRA suite—jammed & spoofed even PL-15E seekers.#Rafale pic.twitter.com/cPofAZwIYf
— Defence Chronicle India (@TheDCIndia) July 7, 2025
पाकिस्तानने चीनी मिसाील PL-15E आणि J-10C फायटर जेट खऱ्या राफेलला पकडू शकले नाहीत. राफेलच्या X-गार्डने शत्रूला खोटी माहीती पुरवली, त्यामुळे त्यांचे मिसाईल आणि KLJ-7A AESA रडार यांना फटका बसला. पाकिस्तानला वाटले की त्यांनी राफेलच टार्गेट केली. वास्तविक पाकिस्तान या X-गार्डला टार्गेट करीत राहीले. हा X-गार्ड जुन्या अमेरिकन सिस्टीम्स उदा.AN/ALQ-50 वा ADM-160 MALD यांच्या पेक्षाही वेगवान आणि उत्तम काम करतो.
यास दोन सेकंदात लाँच करता येते आणि पुन्हा वापरता येते. हा एका डिकॉय विंगमॅनसारखा काम करतो. आणि शत्रूच्या मिसाईलला आपल्याकडे खेचतो. त्यामुळे विमान सेफ राहाते. फायबर ऑप्टीक केबलद्वारे पायलटला मिसाईलच्या प्रत्येक हालचाल आणि सिस्टीमची माहीती मिळत रहाते. आणि हा जॅमिंगने प्रभावित होत नाही.