Vastu Shastra : घरात गंगाजल ठेवता आहात? मग या चुका कधीच करू नका
वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे काही न काही नियम सांगितले आहेत, जर तुम्ही घरात गंगाजल ठेवलं असेल किंवा घरात ठेवण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे काही विशिष्ट नियम सांगण्यात आले आहेत, जसं की तुमचं देवघर कोणत्या दिशेला असावं? देवघरात कोणते देव असावेत? कोणते नसावेत? जे देव तुमच्या देवघरामध्ये आहेत त्यांची योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने पूजा कशी करावी? आपल्या घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर ते घराच्या कोणत्या दिशेला लावावेत? अशा अनेक गोष्टींची माहिती ही वास्तुशास्त्रात देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मानुसार गंगा नदीला सर्वात पवित्र नदी मानलं जातं, हिंदू धर्मानुसार जर तुम्ही गंगेमध्ये अंघोळ केली तर तुमच्या सर्व पापांचं प्रायचित्त होतं, आपण अनेकदा आपल्या घरी देवांची पूजा करण्यासाठी गंगाजल घेऊन येतो. मात्र जेव्हा आपण घरात गंगाजल ठेवतो, तेव्हा त्याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, अन्यथा त्याचा प्रभाव कमी होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? आणि घरात गंगाजल ठेवल्यास काय काळजी घ्यावी?
वास्तुशास्त्रानुसार गंगाजल हे अत्यंत पवित्र असतं, त्यामुळे कधीही दुकानातून किंवा तुम्ही जेव्हा गंगेमधून गंगाजल घेतात, तेव्हा ते कधीही प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये घेऊ नका, तर त्यासाठी पितळ, चांदी किंवा मातीच्या भांड्याचाच वापर करा, गंगाजल हे कधीही प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये घरी आणू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
गंगाजल हे नेहमी डार्क आणि स्वच्छ जागी ठेवा, गंगाजल थेट सूर्य प्रकाशाच्या संपर्कात येईल अशा जागी कधीही ठेवू नका, तसेच एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या, की गंगाजल जिथे ठेवलं आहे, तिथे नेहमी स्वच्छता असावी, तरच त्याचा अपेक्षित परिणाम साध्य होऊ शकतो.
गंगाजल हे कधीही अस्वच्छ जागी, बेसीनच्या वर किंवा किचन वट्याच्या वर ठेवू नका, तर गंगाजल हे नेहमी देवघरात ठेवा, गंगाजल देवघरात ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं.तसेच जिथे गंगाजल ठेवलं आहे, तिथे कधीही मांसहाराचं जेवण करू नका, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
