India-Russia : भारताच्या जवळच्या मित्राला रशिया नवीन युक्रेन बनवणार का? ही अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला मदत

India-Russia : "फक्त रशियावर अवलंबून राहणं आमची रणनितीक चूक होती. रशिया आमची सुरक्षा करु शकला नाही" असं या देशाचे पंतप्रधान म्हणाले. रशियाने वाचवलं नाही म्हणून मग भारताने या देशाला पिनाका रॉकेट लॉन्चर सारखी घातक शस्त्र दिली. आता पुतिन यांच्या भूमिकेमुळे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला मदत होतेय.

India-Russia : भारताच्या जवळच्या मित्राला रशिया नवीन युक्रेन बनवणार का? ही अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला मदत
Putin-Modi
Image Credit source: Getty Images
| Updated on: May 08, 2026 | 3:32 PM

रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. पण अजूनही हे युद्ध सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली. रशियाकडून आपण तेल खरेदी करतो म्हणून भारतावर निर्बंध लादले. पण अमेरिकेलाही हे युद्ध थांबवता आलेलं नाही. या दरम्यान रशियाने आता आणखी एकादेशाला नवीन युक्रेन बनवण्याचा इशारा दिला आहे. म्हत्वाचं म्हणजे हा देशही सोवियत युनियनमधून फुटून बाहेर पडला आहे. आर्मेनियाची युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांच्याशी जवळीक वाढत चालली आहे. रशियाने यावर हे समजण्यापलीकडच असल्याचं म्हटलं आहे. आर्मेनियाला युरोपियन यूनियन सोबत जवळीक वाढवू नका असा स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारिया जखारोवा साप्ताहिक ब्रीफिंगमध्ये म्हणाले की, “आर्मेनियाच्या या भूमिकेमुळे रशियन समाजात नाराजी असून आम्ही हैराण आहोत. आर्मेनिया आमच्यासाठी मित्र, भावासारखा देश आहे. त्यांचा एक प्लॅटफॉर्म म्हणून वापर करण्यात आला. कोणासाठी? एका दहशतवाद्यासाठी”

आर्मेनियाच्या विद्यमान नेतृत्वापैकी कोणीही जेलेंस्कीचा अपमान केला नाही. तर तुम्ही कोणाच्या बाजूने आहात?’ असा प्रश्न मारिया जखारोवा यांनी विचारला. त्यावर आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान म्हणाले की, ‘2022-2023 मध्ये मी हे स्पष्ट केलय की, युक्रेनच्या मुद्यावर आम्ही रशियाला साथ देणार नाही’ रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारिया जखारोवा यांनी आर्मेनिया आणि युरोपियन युनियनच्या संयुक्त घोषणेवरही टीका केली. ही रशियाविरोधी कृती मानली जाईल. आर्मेनियाला याचे गंभीर राजकीय आणि आर्थिक परिणाम भोगावे लागतील असा इशारा जखारोवा यांनी दिला.

व्लादीमीर पुतिन यांनी काय इशारा दिलेला?

आर्मेनियाची लोकसंख्या 30 लाख आहे. इराण आणि तुर्कीला या देशाची सीमा लागून आहे.मागच्यावर्षी या देशाने एक कायदा मंजूर केला. ज्यात युरोपियन युनियनच्या सदस्यतेसाठी अर्ज करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी एप्रिल महिन्यात पशिन्यानला इशारा दिलेला की, ‘आर्मेनिया एकाचवेळी युरोपियन यूनियन आणि रशियाच्या नेतृत्वाखालील सीमा शुल्क ब्लॉक दोघांचा सदस्य बनू शकत नाही’

आर्मेनिया रशियापासून लांब का जातोय?

आर्मेनियाने 1991 साली आपल्या सुरक्षेसाठी रशियावर विश्वास ठेवला. रशियाचा आर्मेनियात मिलिट्री बेसही आहे. 2020 आणि 2023 मध्ये अजरबैजानने नागोर्नो-काराबाख प्रांतावर हल्ला केला. त्यावेळी रशियाने मदत केली नाही. रशियन शांती सैन्य तिथे तैनात होतं. अजरबैजानने सगळा भूभाग आपल्या ताब्यात घेतला. 1 लाखापेक्षा जास्त अर्मेनियन लोकांना त्या भागातून पळून जावं लागलं. त्यावेळी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांनी एक स्टेटमेंट केलेलं. “फक्त रशियावर अवलंबून राहणं आमची रणनितीक चूक होती. रशिया आर्मेनियाची सुरक्षा करु शकला नाही”

हे भारतासाठी चांगला संकेत नाहीत

रशियाने काही केलं नाही म्हणून मग आर्मेनिया भारताचा विश्वासू संरक्षण सहकारी बनला. भारताने आर्मेनियाला पिनाका रॉकेट लॉन्चर सारखी घातक शस्त्र दिली.तुर्की-पाकिस्तान-अजरबैजान या देशांचा एक गट आहे. अजरबैजान पाकिस्तानच्या बाजूने आर्मेनिया भारातच्या बाजूने आहे. भारतासाठी आता एकाबाजूला रशिया आणि दुसरीकडे आर्मेनिया आहे. भारताचे युक्रेन बरोबर इतके चांगले संबंध नव्हते, पण आर्मेनिया बरोबर भारताची घनिष्ट मैत्री होत चालली आहे. रशिया अजरबैजानच्या बाजूने जाणं हे भारतासाठी चांगला संकेत नाहीत.

 

Follow Us