AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच घडले, युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, थेट इराणच्या..

इराण आणि अमेरिका युद्धाने जग वैतागले आहे. फक्त धमक्या आणि बैठका सुरु आहेत. मार्ग काही निघण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच आता इराणला रशियाची साथ मिळाली आहे. इराण आणि अमेरिका युद्धात नुकताच रशियाकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली.

जगाला ज्याची भीती तेच घडले, युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, थेट इराणच्या..
Vladimir Putin
| Updated on: Apr 28, 2026 | 7:42 AM
Share

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची रशियाच्या दाैऱ्यावर पोहोचले. यावेळी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली. या बैठकीकडे जगाच्या नजरा होत्या. यादरम्यान रशियाने आपला जुना मित्र इराणला मदत करण्याचा विश्वास दर्शवला. धक्कादायक म्हणजे ही भेट अशावेळी आहे, ज्यावेळी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाची चर्चा ठप्प आहे. पुतिन यांनी या भेटीदरम्यान स्पष्ट सांगितले की, शांती स्थापित करण्यासाठी रशिया प्रत्येक गोष्ट करेल, जी इराणच्या हितासाठी असेल. या बैठकीनंतर पुतिन यांना थेट अमेरिकेवर हल्लाबोल केला. पुतिन यांनी म्हटले की, अमेरिकेला इराणविरोधातील युद्धात मोठे अपयश मिळाले आहे. युद्धात अपयश मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प वाटाघाटी करण्यासाठी इराणचे पाय धरत आहेत. हेच नाही तर अब्बास अराघची यांनी पुतिन यांच्या भेटीनंतर थेट रशियाला महाशक्ती म्हटले.

रशियासोबत आम्ही खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले. यादरम्यान त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडून काढत म्हटले की, इराण चर्चेसाठी भीक मागत आहे हा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच चर्चेसाठी मागे लागले आहेत. पाकिस्तानमधील बैठकीनंतर अब्बास अराघची थेट रशियाला पोहोचले आहेत.

हा एकप्रकारे अमेरिकेला अत्यंत मोठा धक्का आहे. दुसरीकडे होर्मुज खाडी बंद असल्याने खाडी देश वैतागले आहेत. मोठे नुकसान होत असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे परिस्थिती अधिकच विचित्र बनली आहे. होर्मुज खाडी आता पूर्णपणे ठप्प आहे. दुसरीकडे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची अगोदर पाकिस्तान आणि त्यानंतर थेट रशियात दाखल झाले.

या युद्धात इराणला रशिया मदत करत असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. त्यामध्येच आता रशियाने आपली भूमिका जाहीर केली. रशियाने या युद्धापासून प्रत्यक्षात दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, गुप्तपणे इराणला रशिया मदत करत असल्याचा दावा केला जात आहे. इराण आणि अमेरिका युद्धाला दोन महिने उलटत आहेत. मात्र, अजूनही युद्धविराम होऊ शकला नाही. त्यामध्येच इराणला रशियाची साथ मिळाल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल