AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफवरून भारताला पुन्हा धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना गांर्भियाने घ्या नाही तर…

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला सातत्याने धमकावले जातंय. भारताने देखील डोनाल्ड ट्रम्प यांना जशा जसे उत्तर दिले आहे. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. आता परत भारताला मोठा इशारा हा देण्यात आलाय.

टॅरिफवरून भारताला पुन्हा धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना गांर्भियाने घ्या नाही तर...
Donald Trump
| Updated on: Aug 24, 2025 | 5:27 PM
Share

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले आहेत. अमेरिकेकडून सातत्याने भारताला धमक्या दिल्या जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीही थेट भारतावर टीका केलीये. भारत हा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेला जुमानत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा तळफळाट उडला आहे. हेच नाही तर यादरम्यान भारताची अनेक इतर देशांसोबत जवळीकता वाढलीये. भारताने काही दिवसांपूर्वी चीनसोबत मोठा करार केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला. आता परत एकदा अमेरिकेकडून भारताला धमकी देण्यात आलीये.

काहीही झाले तरीही 27 ऑगस्टपासून भारतावर टॅरिफ लावला जाणार असल्याचे परत एकदा अमेरिकेकडून सांगण्यात आलंय. भारताकडून टॅरिफ टाळण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, अजूनही निर्णय झाला नाहीये. अमेरिकेची टॅरिफबद्दल वेगळी भूमिका बघायला मिळतंय. चीन आणि इतर देशांवर टॅरिफ लावला नाहीये. जगात सर्वात जास्त रशियाकडून तेल खरेदी करणारा देश चीन आहे. मात्र, त्यांच्यावर टॅरिफ लावण्यात आले नाहीये. भारतावर टॅरिफ लावण्याचे कारण अमेरिकेकडून रशियाकडून तेल खरेदी करण्याचे सांगण्यात आलंय.

संयुक्त राष्ट्र अमेरिकाच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी म्हटले की, जगातील दोन मजबूत आणि मोठ्या लोकतांत्रिक देशांच्यामध्ये सुरू असलेली अनेक वर्षांपासूनची मैत्री मतभेदांमध्ये पुढे जाण्याची ताकद आहे. त्यांनी पुढे म्हटले की, व्यापार वाद आणि रशिया तेल आयात या गोष्टींवर चर्चा अत्यंत आवश्यक आहे. पण जे काही टार्गेट आहे ते देखील तितकेच महत्वाचे आहे.

हेली यांनी स्पष्ट केले की, चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेला नक्कीच भारतासारख्या मित्राची गरज आहे. त्यांनी यापूर्वी इशारा देत म्हटले होते की, भारत आणि अमेरिकेचे संबंध अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहेत. हेली यांनी म्हटले की, भारत जसा जसा मजबूत होईल, तशी चीनची महत्वकांक्षा कमी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावर समोरासमोर येईल चर्चा करायला हवी, असेही त्यांनी म्हटले. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना भारताने गांर्भियाने घ्यावे, नाही तर परिणांना सामोरे जावे लागेल..

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा