Kaveri Engine : भारतात बनलेल्या ज्या कावेरी इंजिनला फेल मानलं, तेच इंजिन रशियामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेत पास, अमेरिकेसाठी मोठा धक्का

kaveri Engine Test Successful : भारतीय वैज्ञानिकांनी मोठ्या मेहनतीने, अथक प्रयत्नांनी कावेरी इंजिन विकसित केलं होतं. या इंजिलना फेल प्रोजेक्ट मानण्यात येत होतं. पण आता रशियात या इंजिनने कमालच केली आहे. हा भविष्यात अमेरिकेसाठी धक्का आहे.

Kaveri Engine : भारतात बनलेल्या ज्या कावेरी इंजिनला फेल मानलं, तेच इंजिन रशियामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेत पास,  अमेरिकेसाठी मोठा धक्का
kaveri Engine
| Updated on: Sep 29, 2026 | 5:45 PM

भारताच्या स्वदेशी कावेरी इंजिनने मोठं यश मिळवलं आहे. कावेरी इंजिनने रशियात महत्वाची अग्निपरीक्षा पास केली आहे. त्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्राला मजबुती मिळणार आहे. भारतात बनवण्यात आलेल्या कावेरी इंजिनने रशियात जास्त उंचावरील आणि उड्डाणाच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. या इंजिनने 48.5 किलोन्यूटन (kN) पीक ड्राय थ्रस्ट गाठला. हे प्रमाण 46 kN थ्रस्टपेक्षा जास्त आहे. कावेरी इंजिनने 46 kN थ्रस्ट पर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. पण त्यापेक्षा जास्त थ्रस्ट गाठला. म्हणजे कावेरी इंजिन टारगेटपेक्षा पण जास्त पावरने पळालं. कावेरी तेच इंजिन आहे, ज्याला एकवेळ फेल प्रोजेक्ट ठरवण्यात आलेलं. पण आता या इंजिनने प्रचंड थ्रस्ट निर्माण करुन संपूर्ण जगात भारताची शान उंचावली आहे.

कावेरी इंजिनने रशियातील कठीण हाई-एल्टीट्यूड आणि फ्लाइट ट्रायल्स यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. लक्ष्य 46 किलोन्यूटन असताना या इंजिनने 48.5 किलोन्यूटन थ्रस्ट निर्माण केला. या यशस्वी चाचणीमुळे भविष्यात DRDO च्या घातक स्टेल्थ ड्रोन प्रोजेक्टला पावर मिळेल. भारताच्या इंजिन गॅस टरबाइन रिसर्च एस्टेब्लिशमेंटने (GTRE) कावेरी इंजिन विकसित केलं आहे. शेवटच्या एयरवर्थिनेस सर्टिफिकेशनसाठी सेंटर फॉर मिलिट्री एयरवर्थिनेस अँड सर्टिफिकेशनच्या मंजुरीची आवश्यकता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडकडून (HAL) कावेरी इंजिनचं उत्पादन सुरु होईल.

Loading...

कावेरी इंजिनच्या यशाचा फायदा कुठे होईल?

कावेरी ड्राई इंजिनचं रशियात कठोर परिस्थितीत परीक्षण करण्यात आलं. हाय-एल्टीट्यूड ट्रायल्स मध्ये इंजिनन उंचावरील क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली.फ्लाइट ट्रायल्स मध्ये हे स्थिर आणि प्रभावी राहीलं. ठरवलेल्या टार्गेटपेक्षा जास्त थ्रस्ट मिळवणं हे इंजिनची डिझाइन आणि इंजिनिअरींग मजबूत असल्याचं लक्षण आहे. ड्राय वर्जनचा अर्थ यात आफ्टरबर्नर नाहीय. ड्रोन्स सारख्या प्लॅटफॉर्मसाठी हे उपयुक्त आहे. कारण ड्रोनमध्ये दीर्घकाळ स्थिर आणि किफायती थ्रस्टची आवश्यकता असते. दीर्घकाळ कावेरी इंजिन प्रोजेक्टने वेगवेगळ्या अडचणींचा सामना केला आहे. ड्राय वर्जनचं यश यामुळे प्रोजेक्टला नवी दिशा मिळतेय.

अमेरिकेला धक्का का?

नवीन कावेरी 2.0 आफ्टरबर्नरशिवाय 55 ते 60 किलोन्यूटन ड्राई थ्रस्ट आणि आफ्टरबर्नर सह 90 ते 100 किलोन्यूटन वेट थ्रस्टची क्षमता आहे. यामुळे फायटर जेटला वेगवान उड्डाणासाठी ताकद मिळेल. ही क्षमता सध्याच्या अमेरिकेच्या GE F404 इंजिनच्या बरोबरीची किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अमेरिकेची हीच GE F404 इंजिन तेजस MK1A ला बळ देतायत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us