
जगात भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 146 कोटी आहे. गेल्या दोन शतकात जगातील लोकसंख्या अभूतपूर्व वाढली आहे. आज हा आकडा आठ अब्जावर पोहचला आहे. 1960 दशकांपासून आजपर्यंत केवळ 65 वर्षात तीन अब्जावरुन आठ अब्ज अशी मोठी झेप मानवी लोकसंख्येच्या वाढीचा दर किती आहे हे सांगण्यास पुरेसे आहे. परंतू असे असले तरी काही देशांची लोकसंख्या आश्चर्यकारकरित्या कमी होत आहे.
जगातील लोकसंख्येचा पुर आला असताना काही देशांची लोकसंख्या सातत्याने घसरत चालली आहे. उदाहरण घ्यायचे झाले कर प्रशांत महासागरातील एक छोटे बेट तुवालु या राष्ट्राची चिंताजनक परिस्थिती आहे. येथील एकूण लोकसंख्या निव्वळ 10 हजाराच्या आसपास आहे.जी लागोपाट घटत चालली आहे. आणि घसरणीने या देशाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसाक जगाची लोकसंख्या 2030 पर्यंत 8.6 अब्जापर्यंत पोहचणार आहे. जी 2050 पर्यंत 9.8 अब्ज आणि 2100 पर्यंत 11.2 अब्ज होणार आहे. परंतू सर्वच जागी लोकसंख्या वाढतेय असे नाही. युक्रेन, जपान आणि ग्रीस असे देश आहेत. जेथे लोकसंख्येत कमी होत आहे.
युक्रेनमध्ये 2002 ते 2023 दरम्यान लोकसंख्या सुमारे 8 टक्के घटल्याची नोंद आहे. ज्यास युद्ध आणि मोठ्या स्थलांतर जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. याच धर्तीवर तुवालु देशात दरवर्षी लोकसंख्या 1.8 टक्के कमी होत आहे. त्यामुळे या देशात चिंता व्यक्त होत आहे.
युरोपातील अनेक देशांची लोकसंख्येतही घसरण नोंद झाली आहे. ग्रीसमध्ये एकाच दिवसात 1.6 टक्के लोकसंख्या कमी झाली. तर सॅन मारिनो, कोसोवो, बेलारुस, बोस्निया आणि अल्बानिया सारख्या देशातही लोकसंख्या घटत आहे. रशियाचा शेजारील देश बेलारुसमध्ये लोकसंख्येत सुमारे 0.6 टक्के घट नोंदली गेली आहे.
जपानचा विचार करता येथील लोकसंख्या अर्धा टक्के घट झाली आहे. जपानच्या लोकसंख्या कमी होण्यामागे स्थलांतर हे मुख्य कारण म्हणजे येथील जन्मदर सातत्याने घसरणे हे जबाबदार आहे. जपान सरकारने अनेक प्रकारे प्रोत्साहन देऊन पाहिले आहे. परंतू तरीही लोकांमध्ये कुटुंब वाढवण्याची इच्छा कमी झाली आहे.
आपण महाखंडांचा विचार करतात युरोप हा एकमेव खंड असा आहे जेथे लोकसंख्या निरंतर कमी होत आहे. तर आशिया महाखंडात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. चीन, भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशिया सारखे मोठे देश या वाढीला कारणीभूत आहेत.
ग्रीसच्या लोकसंख्येत घसरणीचा अंदाज आहे. ग्रीसची लोकसंख्या साल 2100 पर्यंत एक दशलक्षाने कमी होऊन सुमारे 9 दशलक्ष राहणार आहे. जी आजच्या सुमारे 10 दशलक्षच्या आकड्यांहून कमी आहे. रशिया, इटली आणि दक्षिण कोरिया सारखे देश देखील या आव्हानाचा सामना करत आहेत.