AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत ४० कोटीहून अधिक किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत तीनपट वाढ, या विभागातील घरांना सर्वाधिक किंमत

मुंबई नगरी बरी बाका...जशी रावणाची दुसरी लंका...असे शाहीर पट्टे बापूरावांनी म्हटले आहे. या मुंबईतील घरांच्या किंमती आता अब्जाधीशांना परवडतील अशा झाल्या आहेत. मुंबईत 40 कोटींहून किंमत असलेल्या घरांची विक्री तिप्पट वाढली आहे.

मुंबईत ४० कोटीहून अधिक किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत तीनपट वाढ, या विभागातील घरांना सर्वाधिक किंमत
| Updated on: Jul 23, 2025 | 8:50 PM
Share

मुंबईत सुईच्या टोकाएवढ्या जागेला किंमत असेल असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. यंदाचे वर्षे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटसाठी खूपच चर्चेत आहे. साल 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात 40 कोटीहून किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली आहे. इंडिया सोथबीस इंटरनॅशनल रियल्टीच्या (Sotheby’s International Realty) नव्या अहवालानुसार 40 रुपयाहून अधिक किंमत असलेल्या घरांची विक्री 2022 च्या पहिल्या सहामाहीच्या 17 युनिट्सनी वाढून 2024 च्या सहामाहीत 53 युनिट्स झाली होती. म्हणजे तीनपट वाढ झाली होती.

या दरम्यान मुंबईतील 10 कोटी रुपयांहून जास्त किंमत असलेल्या घरांची प्रायमरी आणि सेकेंडरी विक्रीने 14,750 कोटी रुपयांची विक्री नोदविली आहे. ही गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाही (H1 CY24)मध्ये झालेल्या 12,300 कोटी रुपयांच्या तुलनेत 11 टक्के दरसाल वाढ दाखवत आहे.

Sotheby’s International Realty च्या अहवालात म्हटले आहे की 2025 पहिल्या सहामाहीत झालेल्या लक्झरी घरांची विक्री गेल्यावर्षी ( 2024 ) याच काळात झालेल्या घरविक्रीच्या 11 टक्के वाढली आहे. आणि 20-40 कोटी रुपयांच्या घरांची विक्री 2022 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 138 टक्के वाढली आहे.

वरळीचा पहिला क्रमांक

प्रायमरी मार्केटचा घरांच्या विक्रीच्या प्रमाणात जवळपास 75 टक्के वाटा राहीला आहे. तर सेकेंडरी मार्केटने 3,750 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. दोन्ही मार्केट गेल्या पाच वर्षांच्या आपल्या उच्चतम स्तरावर आहेत.आलिशान घराच्या विक्रीत सर्वात पसंदीचे ठिकाण लक्झरी डेस्टीनेशन म्हणून वरळीने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर ज्यात प्रायमरी विक्री मुल्याचा वाटा 22 टक्के होता.

 वांद्रे पश्चिम पसंतीला

अन्य वेगाने वाढणाऱ्या मायक्रो-मार्केट्समध्ये वांद्रे पश्चिम सामील आहे. वांद्रे पश्चिम येथे 192 टक्के शानदार वाढ झाली आहे. ताडदेव येथे 254 टक्के जबरदस्ती वाढ पाहायला मिळाली आहे. या शिवाय प्रभादेवी आणि मलबार हिल यांचाही समावेश आहे.या दरम्यान 2,000-4,000 चौरस फूटांचे अपार्टमेंट्सने मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटवर दबदबा कायम ठेवला आहे.जो प्रायमरी विक्रीचा 70 टक्के हिस्सा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.