पाकिस्तानला भरली धडकी, भारताचा फ्रान्ससोबत होणार सर्वात मोठा करार, तब्बल 114 राफेल विमानं….

भारत फ्रान्सकडून 32 लाख कोटी रुपयांची लढाऊ विमाने खरेदी करण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर तशा हालचाली सुरू आहेत. पाकिस्तानसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानला भरली धडकी, भारताचा फ्रान्ससोबत होणार सर्वात मोठा करार, तब्बल 114 राफेल विमानं....
pakistan and shahbaz sharif
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 08, 2026 | 5:33 PM

India France Rafale Jet Deal : येत्या 18 ते 20 फेब्रुवारीच्या काळात भारतात एआय समिट होणार आहे. या समिटसाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन भारतात येणार आहेत. मॅक्रॉन भारतात येण्याआधी केंद्रीय संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांची संरक्षण अधिग्रहण परिषदेसोबत (DAC) बैठक होणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत संरक्षण शस्त्र तसेच इतर सामग्रीच्या खरेदीबाबतच्या प्रस्तावांवर विचार केला जणार आहे.

भारताच्या ताफ्यात दाखल होणार तब्बल 114 लढाऊ विमाने

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार याच बैठकीत फ्रान्सकडून 32 लाख कोटी रुपयांची एकूण 114 राफेल विमानांच्या खरेदीला मान्यता दिली जाण्याची क्यता आहे. यातील 18 विमाने लगेच उड्डाण घेण्यास तयार असतील. तर काही विमानांची निर्मिती ही भारतात केली जाणार आहे. भारतात तयार होणाऱ्या विमानांमध्ये 60 टक्के तंत्रज्ञान हे भारतीय असेल. फ्रान्स आणि भारत यांच्यात हा करार लवकरच होण्याची शक्यता आहे. या करारातील 114 राफेल विमानांमधील साधारण 80 टक्के विमानांची निर्मिती ही भारतातच केली जाईल. या करारात भारताला 88 सिंगल सिटर तर 26 टू सिटर लढाऊ विमाने मिळतील. या विमानांतील बहुसंख्य विमाने ही डसॉल्ट आणि भारतातील खासगी कंपन्यांच्या मदतीने तयार केली जातील.

मॅक्रॉन भारतात आल्यानंतर कराराला अंतिम रुप?

संरक्षण खरेदी बोर्डाकडून या प्रस्तावाला गेल्या महिन्यातच मंजुरी मिळालेली आहे. आणखी एक उच्चस्तरीय मंजुरी मिळाल्यानंतर या कराराविषयी चर्चा सुरू होईल. इमॅन्यूअल मॅक्रॉन भारतात येणार आहेत. त्यावेळी या कराराला अंतिम रुप मिळण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची झोप उडाली

दरम्यान, पहलगामवरील हल्ल्यानंतर भारत आपल्या सुरक्षेच्या बाबतीत खूपच सतर्क झालेला आहे. पाकिस्तान आणि चीनची जवळीक पाहता भारताने शस्त्रांच्या बाबतीत सज्ज राहण्याचे ठरवलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा महत्त्वाचा करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु भारताचे हे पाऊल म्हणजे पाकिस्तान तसेच चीनसाठी मोठे आव्हान असणार आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.