
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. परंतून दोन्ही देशांतील तणाव अद्याप निवळला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर हे संबंध बिघडले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. याच ऑपरेशन सिंदूरची लष्करामार्फत माहिती देण्यात येत आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मिराज या लढाऊ विमानाची कशी दुर्दशा केली, याचे थेट पुरावेच सादर केले आहेत.
भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच लष्कराने काही महत्त्वाचे फोटो दाखवले. या फोटोंमध्ये पाकिस्तानच्या मिराज या लढाऊ विमानेच अवशेष दाखवण्यात आले. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच हे अवशेष दाखवण्यात आल्याने आता पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षात पाकिस्तानी लष्कराची सरशी झाल्याचा दावे तेथील राजकीय नेते, लष्कर करत आहे. असे असताना भारताने मात्र मिराज या लढाऊ विमानाचे भग्न अवशेष दाखवून पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.
पाकस्तानी हवाई दलाकडे एकूण दोन प्रकारची मिराज लढाऊ विमाने आहेत. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानने ही विमाने फ्रान्सच्या डसॉल्ट या कंपनीकडून खरेदी केलेली आहेत. पाकिस्तानकडे मिराज-3 आणि माराज-5 ही सुपरसोनिक एअरक्राफ्ट्स आहेत. पाकिस्तानकडे असलेली ही विमाने आता जुनी झाली आहेत. मात्र जुनी असली तरी पाकिस्तानने या विमानांना वेळोवेळी अपग्रेड केलेले आहे. त्यामुळेच पाकिस्तानी लष्करात या विमांनांना फार महत्त्व आहे. पाकिस्तानी सेना मिराज-3 ला इंटरसेप्टर किंवा एअर डिफेन्ससाठी वापरते. तर मिराज-5 ला पाकिस्तानी लष्कर जमिनीवरून हल्ला करण्यासाठी वापरते. भारताने पाकिस्तानचे हेच मिराज लढाऊ विमान नेस्तनाबूत केले आहे.
भारताने पाकिस्तानच्या काही ड्रोन्सनादेखील पाडले आहे. पाकिस्तानने हे ड्रोन्स टर्कीकडून खरेदी केले होते. 8 आणि 9 मे रोजी पाकिस्तानने एकूण 36 सैन्याची तळं आणि नागरी वस्त्यांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले होते. भारतीय लष्कराने या सर्व ड्रोन्सवर यशस्वी हल्ला करून त्यांना निकामी केले होते.
#WATCH | Delhi: While DGMOs briefing, Indian military shows the debris of Pakistani Mirage pic.twitter.com/VQXL5bG8pZ
— ANI (@ANI) May 12, 2025
दरम्यान, आता भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओ यांच्यात आज म्हणजेच 12 मे रोजी महत्त्वाची चर्चा होणार आहे. दहशतवाद तसेच सध्याच्या तणावाच्या स्थितीवर दोन्ही डीजीएमओंत चर्चा होणार आहे.