AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट, भारताचा जोरदार धक्का, ‘या’ देशासोबत करणार थेट 10 करार, टॅरिफच्या धमक्यांनी…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावून स्वत:च्याच पायावर दगड पाडून घेतलाय. आता भारताने अमेरिकेच्या भूमिकेच्या विरोधात जोरदार पाऊले उचलण्यास सुरूवात केलीये. यामुळे हा मोठा धक्का डोनाल्ड ट्रम्प यांना म्हणावा लागणार आहे. काहीही झाले तरीही अमेरिकेच्या दबावा पुढे झुकायचे नसल्याची भूमिका भारताची आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट, भारताचा जोरदार धक्का, 'या' देशासोबत करणार थेट 10 करार, टॅरिफच्या धमक्यांनी...
| Updated on: Aug 12, 2025 | 2:29 PM
Share

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिककडून टॅरिफसाठी भारतावर एक दबाव निर्माण केला जातोय. अमेरिकेच्या या निर्णयानंतर अनेक देशांनी भारताची साथ दिली असून पाठिंबा दर्शवला आहे. टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. फक्त हेच नाही तर भारताबद्दल गरळ ओकताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत. पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. आता भारताकडून अमेरिकेला चोख प्रतिउत्तर देण्याची तयारी सुरू आहे. मोठा धक्का भारत डोनाल्ड ट्रम्प यांना देतोय.

भारताकडून सिंगापूरसोबत महत्वाचे आणि अतिशय मोठे असे 10 करार केली जाणार आहेत. विशेष म्हणजे या आठवड्यात दोन्ही देशांच्या मंत्र्यांमध्ये बैठक होणार असून कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास, तंत्रज्ञान या क्षेत्रांसह 10 करार होणार आहेत. या माध्यमातून दोन्ही देशांना वेगळी दिशा मिळणार आहे. यावर सध्या भारत आणि सिंगापूरमध्ये काम सुरू आहे. पुढच्याच आठवड्यात हे करार होणार आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील करार हे अमेरिकेला मोठा धक्काच आहे.

भारतातून सिंगापूरला सौरऊर्जा पोहोचवण्यासाठी समुद्राखालून केबल टाकली जाणार आहे, या मोठ्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सध्या सुरू आहे. या प्रक्रियेमुळे डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे पुढच्याच महिन्यात भारत दाैऱ्यावर आहेत. त्याअगोदरच या 10 करारांना अंतिम स्वरून मिळण्याची शक्यता आहे. भारतातून सिंगापूरला ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजन निर्यात करण्याचा प्रस्ताव देखील यामध्ये आहे.

द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या एकंदर दृष्टिकोनाचा हा एक भाग असल्याचे सांगितले जातंय. अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयानंतर भारत आणि सिंगापूरमधील करार लवकरच होणार आहे, त्यानुसार पाऊले उचलली जात आहेत. काहीही झालं तरीही भारत अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट आहे. भारत अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयाला विरोध करत आहे. अमेरिकेची सर्वात मोठी समस्या ही रशियाकडून भारत कच्चे तेल विकत घेत आहे, हीच आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.