Russia: रशियाकडून इंधन खरेदी बंद? रशियाकडून सर्वात मोठा खुलासा,Donald Trump पुन्हा तोंडावर आपटणार?

Russian Crude Oil: रशियाकडून भारताने इंधन खरेदी पूर्णपणे थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यावर आता रशियाकडून सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा तोंडघशी पडल्याचे समोर येत आहे.

Russia: रशियाकडून इंधन खरेदी बंद? रशियाकडून सर्वात मोठा खुलासा,Donald Trump पुन्हा तोंडावर आपटणार?
भारत-रशिया-अमेरिका
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 12, 2026 | 1:12 PM

Russian Crude Oil: रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी इंधन खरेदी बाबत मोठे वक्तव्य केले आहे.भारत हा रशियाकडून इंधन खरेदी बंद करणार या चर्चा केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच करत असल्याचे ते म्हणाले. ट्रम्प यांच्याशिवाय असा दावा कोणीच करत नसल्याचे ते म्हणाले. लावरोव यांच्या मते, रशिया आणि भारत यांच्यादरम्यान इंधन आणि इतर करार पूर्णपणे सुरक्षित आहेत. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी भारतासोबतचा व्यापारी कराराचा मसुदा जाहीर केला होता. त्यानंतर हा करार प्रत्यक्षात आला. त्यातही बदल करण्यात आला आहे. त्यावेळी ट्रम्प यांनी दावा केला की, भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात थांबवण्यास मंजुरी दिली आहे. रशिया इंधन विक्री करून मोठी कमाई करतो आणि हा पैसा युक्रेनविरोधातील युद्धासाठी वापरल्या जात असल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे.

भारताची भूमिका काय?

लावरोवा यांच्या वक्तव्यापूर्वी भारताने या मुद्दावर खुलासा केला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याविषयी मोठे वक्तव्य केले. भारत आपल्या गरजेनुसार विविध देशांकडून इंधन खरेदी करेल असे ते म्हणाले. पुरवठा साखळी नियंत्रीत आणि स्थिर ठेवण्यासाठी भारत स्त्रोतांमध्ये विविधता आणेल असे ते म्हणाले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की 1.4 अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची प्राथमिकता आहे. तर रशियासोबतचे यापूर्वीचे करार जैसे थे असल्याचे जायसवाल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ट्रम्प हे पुन्हा तोंडघशी पडल्याचे दिसून आले.

ऑगस्ट 2025 मध्ये रशियाकडून इंधन खरेदी सुरूच ठेवल्याने अमेरिकेने भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावला होता. त्यानंतर या महिन्यात हे टॅरिफ मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. पण भारताने पुन्हा जर रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली तर मागे घेतलेले 25% टॅरिफ पुन्हा लावण्यात येईल असा इशारा अमेरिकेने दिला आहे. पण भारताने एकीकडे व्यापारी कराराबाबत अमेरिकेच्या भूमिकेचे कौतुक करतानाच रशियाकडून इंधन खरेदीच्या अटीवर भाष्य केले नव्हते. तर आता भारतीय परराष्ट्र विभागाने रशियाकडून तेल खरेदीबाबतचे करार जैसे थे असल्याचे स्पष्ट केले आहे.

लावरोव यांचा अमेरिकेवर मोठा आरोप

लावरोव यांनी अमेरिकेवर आरोप केला आहे की भारत आणि ब्रिक्स देशांसोबत रशिया व्यापार, गुंतवणूक आणि लष्करी सहकार्य करत असल्याने ते थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. अमेरिका टॅरिफ, प्रतिबंध, दबाव अशी पावलं टाकून जगभरात दबदबा तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प सरकार आल्यापासून जगाला वेठीस धरण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही लावरोव यांनी केला आहे.