संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने फाडला पाकिस्तानचा बुरखा, थेट म्हटले, तुम्ही तुमच्या लोकांवर बॉम्ब टाकता, आमच्या..

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिले आहेत. त्यामध्येच आता भारताने पाकिस्तानला मोठा दणका दिला. ज्याने एकच खळबळ उडाली. जागतिक मंचावर भारताने पाकिस्तानला पळता भुई कमी केली.

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने फाडला पाकिस्तानचा बुरखा, थेट म्हटले, तुम्ही तुमच्या लोकांवर बॉम्ब टाकता, आमच्या..
United Nations Council
| Updated on: May 21, 2026 | 8:57 AM

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यात चांगलेच फटकारले आहे. भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. भारताने विचारलेल्या प्रश्नांवर साधे उत्तरही पाकिस्तानला देता आले नाही. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा आवाज दाबला. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका करत त्यांना पळता भुई कमी केली. पाकिस्तानला खडेबोल सुनावत त्यांनी म्हटले की, नरसंहार आणि हिंसाचाराचा इतिहास असलेल्या देशाला भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. पी. हरीश ज्या पद्धतीने बोलले, त्यावर पाकिस्तान साधे उत्तरही देऊ शकला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध कायमच तणावात राहिली. त्यामध्येच पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर स्थिती अधिकच गंभीर झाली. भारताने पाकिस्तानला एका मागून एक मोठे दणके दिले आहेत. ज्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले.

संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये भारताने युनामाच्या एका अहवालाचा हवाला दिला. ज्यानुसार 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांत पाकिस्तानी लष्कराच्या सीमापार कारवाया आणि हवाई हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानमध्ये 750 नागरिक ठार आणि जखमी झाले. युनामाच्या मते, या 95 घटनांपैकी 94 घटनांसाठी पाकिस्तानी सुरक्षा दल जबाबदार होते. ज्यानंतर भारताने थेट पाकिस्तानवर हल्ला चढवला.

हेच नाही तर संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना पी. हरीश यांनी थेट म्हटले की, अरे तुम्ही तुमच्याच लोकांवर बॉम्ब टाकतात. तुम्ही आमच्याबद्दल काय बोलता? पाकिस्तानने ऐन रमजान महिन्यात मोठी कारवाई अफगाणिस्तानवर केली. ज्यामध्ये अनेक लोकांचा जीव गेला. थेट रूग्णालयावरही हल्ला पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केला. ज्यावरूनही भारताने पाकिस्तानचा क्लास लावला.

जागतिक मंचावर पाकिस्तानला भारताने तोंडावर पाडले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. सतत मोठे हल्ले केले जात आहेत. अफगाणिस्तानला भारत मदत करत असल्याचा मोठा आरोप करण्यात आला. मात्र, भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले. पाकिस्तानमध्ये सध्या स्थिती गंभीर आहे.

Follow Us