
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवाद्यांना पुरस्कृत करणारे धोरण भारताने पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मदत केली जात असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानची पोलखोल केली आहे. संयुक्त राष्ट्र संघात (युनो) पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला उघडे पाडले आहे.
योजना पटेल यांनी संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानचे नाव न घेता म्हटले की, आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा एक विशेष प्रतिमंडळ नेहमी दुरुपयोग करत आला आहे. या व्यासपीठावरुन भारतावर चुकीचे आरोप लावले जात आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी बैठकीत बोलताना योजना पटेल यांनी पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडले. भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी आणि बेकायदेशीर आरोप करण्यासाठी पाकिस्तान नेहमी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करत असल्याचे योजना पटेल यांनी म्हटले.
संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी सांगितले की, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीदरम्यान दहशतवादाला पाठिंबा आणि निधी दिल्याची कबुली दिली आहे. आसिफ यांनी दहशतवादी संघटनांना कसा पाठिंबा दिला, दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले, निधी दिले, याबाबत जे सांगितले हे संपूर्ण जगाने पाहिले. त्यांच्या या कबुलीमुळे कोणाला आश्चार्य वाटले नाही. कारण पाकिस्तान जागतिक दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान असल्याचे संपूर्ण जगाला माहीत आहे.
#WATCH | Ambassador Yojna Patel, India's Deputy Permanent Representative at the UN says, "The Pahalgam terrorist attack represents the largest number of civilian casualties since the horrific 26/11 Mumbai attacks in 2008. Having been a victim of cross-border terrorism for… pic.twitter.com/ltwQxJN2iP
— ANI (@ANI) April 29, 2025
योजना पटेल यांनी म्हटले की, मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाव हल्ल्यात सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादांचा भारत बळी पळला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील देश आणि त्यांच्या नेत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल भारत मनापासून आभारी आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत अमेरिका आणि पाश्चत्य राष्ट्रांच्या दबावामुळे पाकिस्तानने दहशतवादास प्रोत्साहन दिल्याचे घाणरडे काम केले आहे. त्याची किंमत तीन दशकांपासून पाकिस्तान मोजत आहे, असे आसिफ यांनी म्हटले होते.