Donald Trump : अमेरिकेला जे वाटलं नव्हतं ते भारताने केलं, दादागिरी करणाऱ्या ट्रम्पना एकदम कडक उत्तर

Donald Trump : भारत आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत कसेही वागलो तरी काही फरक पडत नाही, या धुंदीत असणार्‍या अमेरिकेला भारताने मोठा धक्का दिला आहे. एका रणनितीक मुद्यावर भारताने अमेरिकेला झटका देणारी भूमिका घेतली आहे.

Donald Trump : अमेरिकेला जे वाटलं नव्हतं ते भारताने केलं, दादागिरी करणाऱ्या ट्रम्पना एकदम कडक उत्तर
India-US
| Updated on: Oct 08, 2025 | 1:42 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अलीकडेच म्हणालेले की, आम्ही बगराम एअरबेस तालिबानला मोफत दिला. आता आम्हाला तो परत हवा आहे. अफगाणिस्तानने बगराम एअरबेस परत केला नाही, तर त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील अशा इशारा ट्रम्प यांनी दिला. अफगाणिस्तान तालिबानचे प्रवक्ते ज़बिहुल्लाह मुझाहिद यांनी स्पष्ट केलं की, आम्ही कोणालाही आमची जमीन देणार नाही. बगराम एअरबेस परत घेण्याची अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जी तालिबानला धमकी दिलीय, त्याला भारताने विरोध केलाय. नुकतच मॉस्को येथे सातवं ‘मॉस्को फॉर्मेट’ सम्मेलन पार पडलं. तिथे भारताने तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांचं स्वागत केलं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बगराम एअरबेस पुन्हा ताब्यात घेण्याच्या मागणीला भारताने विरोध केलाय.

भारताने बगराम एअरबेसच नाव घेतलं नाही, पण अफगाणिस्तानची संप्रभुता आणि स्थिरतेला आपलं पहिलं प्राधान्य आहे असं म्हटलं. मॉस्को फॉर्मेटच्या बैठकीला अफगानिस्तान, भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, इराण, ताजिकिस्तान, कज़ाखिस्तान आणि अन्य देश सहभागी झालेले. या बैठकीत पहिल्यांदा तालिबानकडून परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी उपस्थित होते.

भारताने अफगाणिस्तानला कशामध्ये सहकार्य केलय?

भारताने अजूनपर्यंत तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाही. पण त्यांच्यासोबत मानवीय आणि विकासात्मक सहकार्य वाढवलं आहे. अफगाणिस्तानचा हेल्थकेअर आणि कृषी क्षेत्रात मदत केली. गरीबी उन्मूलन आणि आपत्ती व्यवस्थापनात योगदान दिलं. अफगाणिस्तानला क्षेत्रीय कनेक्टिविटी आणि व्यापारात जोडण्याचा प्रयत्न केला. सोप्या शब्दात भारताने ट्रम्प यांचा धमकीचा मार्ग सोडून संवाद आणि विकासाला प्राधान्य दिलं.

ऐतिहासिक पाऊल

9 ऑक्टोंबर ते 16 ऑक्टोंबर दरम्यान तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारतात येणार आहेत. त्यावेळी भारताचं हे स्टेटमेंट आलय. मुत्ताकी यांचा हा पहिला अधिकृत भारत दौरा आहे. हा दौरा फक्त राजकीय भेट नाही, तर क्षेत्रीय शांतता, सहकार्य आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्याचं ऐतिहासिक पाऊल आहे.

ट्रम्पना बगराम एअरबेस पुन्हा का हवा?

बगराम एअरबेस एक सामान्य एअरबेस नाही. काबूलपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. दोन मोठ्या धावपट्ट्या स्ट्रॅटजिक ताकद आहे. म्हणून ट्रम्प प्रशासनाला पुन्हा हा एअरबेस हवा आहे. बगराम एअरबेस सोवियत युनियनने 1950 च्या दशकात बनवला होता. 1980 च्या दशकात सोवियत यूनियन आणि अफगाणिस्तान युद्धात हा बेस सोवियत युनियनच मुख्य केंद्र होता. 2001 सालच्या 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तावर ताबा मिळवला. इथला सगळा कंट्रोल आपल्या हातात घेतला.