AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Javelin System : डोंगर असो वा मैदान, पाकिस्तानवर काळ बनून तुटून पडणार, भारत अमेरिकेकडून विकत घेणार खतरनाक अस्त्र

Javelin System : भारत अमेरिकेकडून लवकरच एक खतरनाक शस्त्र विकत घेणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचं टेन्शन नक्कीच वाढेल. डोंगर असो वा मैदान, हे वेपन पाकिस्तानवर काळ बनून तुटून पडेल. या करारामुळे भारत-अमेरिका अजून परस्परांच्या जवळ येतील.

Javelin System : डोंगर असो वा मैदान, पाकिस्तानवर काळ बनून तुटून पडणार, भारत अमेरिकेकडून विकत घेणार खतरनाक अस्त्र
Javelin SystemImage Credit source: lockheedmartin
| Updated on: Aug 28, 2026 | 6:05 PM
Share

भारत आणि अमेरिकेतील संरक्षण सहकार्याबाबत एक मोठी बातमी आहे. भारताची अमेरिकेकडून जॅवलिन अँटी टँक मिसाइल सिस्टिम खरेदी करण्याची योजना आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. भारत-अमेरिका संरक्षण संबंधांसाठी हे एक मोठं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन्ही देश एकत्र येऊन जॅवलिन अँटी टँक सिस्टिमच उत्पादन करतील अशी शक्यता सुद्धा त्यांनी व्यक्त केली. जॅवलिन एक पोर्टेबल अँटी टँक मिसाइल सिस्टिम आहे. सैनिक हे मिसाइल खांद्यावरुन लॉन्च करु शकतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे ही सिस्टिम वेगवेगळ्या भागात वेगाने तैनात करता येते. डोंगराळ भागापासून ते मोकळ्या मैदानापर्यंत या सिस्टिमचा वापर करता येतो. रणगाडे आणि चिलखती वाहनांना टार्गेट करण्यासाठी ही सिस्टिम बनवण्यात आली आहे.

भारताच्या जॅवलिन खरेदी करण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध अजून मजबूत होतील असं अमेरिकी राजदूताने सांगितलं. मे 2026 मध्ये शांगरी ला डायलॉगवेळी अमेरिकी संरक्षण मंत्र्यांनी जे म्हटलेलं त्याचा उल्लेख केला. या करारामुळे भारताचा जॅवलिन सहउत्पादनाचा मार्ग सुद्धा खुला होऊ शकतो. भारत दीर्घकाळापासून आपल्या सैन्याची अँटी टँक क्षमता मजबूत करण्यावर काम करत आहे. जॅवलिन खरेदीला याच रणनितीशी जोडलं जात आहे. सीमावर्ती भागात टँक आणि चिलखती वाहनं उडवण्यासाठी हे एक महत्वपूर्ण शस्त्र आहे.

फायर अँड फरगेट

भारतीय सैन्याने अमेरिकी फॉरेन मिलिट्री सेल्स प्रक्रियेतंर्गत जॅवलिन अँटी टँक गाइडेड मिसाइल सिस्टिम खरेदी करण्यासाठी लेटर ऑफ ऑफर एंड एक्सेप्टेंसवर (LOA) स्वाक्षरी केली आहे. भारत जॅवलिन सिस्टिमचा ग्राहक बनल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. या करारामुळे भारत-अमेरिका संरक्षण संबंध अधिक दृढ होतील असं अमेरिकी राजदूत सर्जियो गोर यांनी म्हटलं. जॅवलिन एक एडवांस्ड, मीडियम-रेंज, फायर अँड फरगेट रणगाडाविरोधी मिसाइल आहे. चिलखती वाहनं आणि मजबूत ठिकाणाविरोधात त्याचा वापर केला जातो. अमेरिकी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, जॅवलिन सिस्टिमचं उत्पादन आरटीएक्स आणि लॉकहीड मार्टिन एकत्र करतात. ही सिस्टिम अमेरिकन सैन्य आणि मरीन कॉर्प्स शिवाय अन्य दुसऱ्या देशांचं सैन्य सुद्धा वापरतं.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान